वंशाच्या दिव्यासाठी पत्नीसह चिमुरडींना लाथाडले संतापजनक : हतबल मातेची न्यायासाठी पोलीस ठाण्यात धाव
By admin | Published: August 5, 2016 10:25 PM2016-08-05T22:25:09+5:302016-08-05T22:25:09+5:30
जळगाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. या संतापजनक प्रकाराची माहिती झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनीही पोलीस ठाण्यात येऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
Next
ज गाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. या संतापजनक प्रकाराची माहिती झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनीही पोलीस ठाण्यात येऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.आज सर्वत्र स्त्री-भ्रूणहत्या होऊ नये, कन्या जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याने लोकांची मानसिकतादेखील बदलत आहे. परंतु या सकारात्मक परिस्थितीत अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात माहेरी राहणार्या विवाहितेवर अतिशय दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. या विवाहितेचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुखाने सुरू होता. मात्र, विवाहितेच्या पोटी वर्षभरापूर्वी दोन कन्यांनी जन्म घेतला आणि तिच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. सासरच्या मंडळीने वंशाला दिवाच हवा म्हणून तिचा छळ केला. त्यात तिचा पतीही मागे राहिला नाही. त्याने दोन्ही मुली नको; मुलगाच हवा म्हणून या चिमुरडींना संपवण्याची भाषा केली. मात्र, मातेच्या हृदयाला हे कधीही पटणारे नव्हते. म्हणून या दाम्पत्यात खटके उडू लागले. शेवटी त्याने पत्नीसह दोन्ही चिमुरडींना तिच्या माहेरी पाठवून दिले.मुलींचे संगोपन कसे करणार?माहेरची परिस्थिती हलाकिची. त्यात स्वत:चे व मुलींचे संगोपन कसे करायचे? हा त्या विवाहितेसमोर मोठा प्रश्न आहे. या प्रकाराची माहिती झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरी, मंगला बारी, संगीता गवळी, विमल वाणी, सुचित्रा महाजन, मनीषा पाटील यांनी त्या विवाहितेला सोबत घेऊन न्यायासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. विवाहितेने तिची संपूर्ण कहाणी सांगितली.