बंदोबस्तावरील पोलीस शहराबाबत अनभिज्ञ
By admin | Published: August 31, 2015 12:24 AM2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
भाविकांची दिशाभूल : पायपीटमध्ये झाली वाढ
Next
भ विकांची दिशाभूल : पायपीटमध्ये झाली वाढनाशिक : सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी संपूर्ण राज्यभरातून सुमारे बारा हजार पोलीस मागविले खरे; परंतु त्यांच्याबरोबर शहराची माहिती असलेले स्थानिक पोलीस न दिल्याने भाविकांना चुकीची माहिती दिली गेली़ एकाच जागेवर फिरून येणार्या या भाविकांच्या पायपिटीत भर पडल्याने त्यांनी पोलीस यंत्रणेला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली़पर्वणीसाठी कोट्यवधी भाविक शहरात दाखल होतील, असे गृहीत धरून पोलीस यंत्रणेने संपूर्ण शहरात एकप्रकारे संचारबंदीच लागू केली होती़ त्यातच इतक्या मोठ्या संख्येने शहरात येणार्या भाविकांच्या नियंत्रणासाठी राज्यभरातून पोलीस कर्मचारीही मागविण्यात आले़ त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही प्रशिक्षणार्थी पोलिसांची असून, त्यांचा सेक्टरनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ मात्र या रिक्रूटला नाशिक शहराची पूरेपूर माहिती नसल्याचा प्रत्यय भाविकांना आला़साधू-महंतांच्या स्नानानंतर भाविकांना टप्प्याटप्प्याने निर्धारित केलेल्या मार्गावरील घाटांवर स्नानासाठी सोडले जात होते़ स्नान आटोपून या भाविकांना आपापल्या ठिकाणी परतता यावे यासाठीदेखील मार्ग निर्धारित करण्यात आले होते़ गोदाघाटावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी हे शहरातील विविध मार्गांबाबत अनभिज्ञ असल्याने व त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस कर्मचारी नसल्याने भाविकांची मोठी दिशाभूल झाली़ काही भाविक तर फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत असल्याने संतप्त होऊन हमरी-तुमरीच्या घटनाही घडल्या़रविवार कारंजावरील गणपती मंदिरासमोर ड्यूटीवर असलेल्या पोलीस अधिकार्याला वृद्ध व्यक्ती अद्वतद्वा बोलत होती़ कारण या वृद्धांना दाखविलेल्या मार्गावरून तीनवेळा फिरूनही पुन्हा त्याच ठिकाणी येत असल्याने त्यांचा संताप झाला होता़ तर दुसर्या घटनेत साधुग्राममध्ये बारा बटालिया खालशात बिहार येथील पंकज प्रसाद गुप्ता हे मुक्कामी होते़ वृद्ध आई-वडील, पत्नी व छोट्या मुलीसह त्यांनी रामकंुडावर स्नान केले़ स्नान आटोपल्यानंतर साधुग्राममध्ये परतण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा मार्ग विचारला असता त्यांनी डोंगरे वसतिगृहाकडे जाण्याचा मार्ग दाखविला़ यामुळे ते कुटुंबीयासह डोंगरे वसतिगृहावर गेले़ तेथून त्यांना परत रामघाटाकडे पाठविण्यात आले़ यामध्ये त्यांच्या माता-पित्यांसह त्यांच्या लहान मुलीला त्रास झाल्याने त्यांनी एकंदरीतच संपूर्ण पोलीस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली़(प्रतिनिधी)फोटो :- आर / फोटो / २९भाविक हाल फोटो या नावाने सेव्ह केला आहे़