'पोलिसांनी दंडुक्याऐवजी डेटावर काम करण्याची गरज' , डीजी-आयजी कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 10:48 PM2024-01-07T22:48:26+5:302024-01-07T22:49:23+5:30

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली डीजी-आयजी परिषद रविवारी संपली. परिषदेच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित केले आणि पोलीस यंत्रणेत अनेक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले.

Police need to work on data instead of baton PM Modi said in DG-IG conference | 'पोलिसांनी दंडुक्याऐवजी डेटावर काम करण्याची गरज' , डीजी-आयजी कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले,...

'पोलिसांनी दंडुक्याऐवजी डेटावर काम करण्याची गरज' , डीजी-आयजी कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जयपूरमध्ये पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या (DG-IG) अखिल भारतीय परिषदेला संबोधित केले. पीएम मोदींनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की, पोलिसांनी आता लाठीमार करण्याऐवजी डेटावर काम करण्याची गरज आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय पोलिसांना आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या पोलिस दलात स्वतःचे रूपांतर करण्यावर भर द्यावा लागेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन प्रमुख फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हा फौजदारी न्याय व्यवस्थेतील एक आदर्श बदल आहे. ‘नागरिक प्रथम, सन्मान प्रथम आणि न्याय प्रथम’ या भावनेने नवे फौजदारी कायदे करण्यात आले आहेत. महिला कधीही आणि कुठेही निर्भयपणे काम करू शकतील याची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यास पोलिसांना सांगितले.

जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे आवाहन त्यांनी पोलिसांना केले. जनतेच्या हितासाठी पोलीस ठाण्यांनी सकारात्मक माहिती आणि संदेश प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा. जयपूरमध्ये तीन दिवस चाललेल्या डीजी-आयजी परिषदेचा आज शेवटचा दिवस होता.

परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी नागरिकांमध्ये पोलिसांची सकारात्मक प्रतिमा मजबूत करण्यासाठी अधिकाऱ्यांवरही भर दिला. त्यासाठी सामान्य जनता आणि पोलीस यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी विविध क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. यासोबतच सरकारी अधिकाऱ्यांनाही स्थानिक लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये राहण्याचे आवाहन करण्यात आले.

भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य-एल 1 च्या यशाबद्दल आणि भारतीय नौदलाने अरबी समुद्रात अपहरण केलेल्या जहाजातून २१ क्रू मेंबर्सची सुटका केल्याबद्दल भारतीय नौदलाचे कौतुक केले आणि म्हटले की अशा यशांमुळे भारत जगातील एक मोठी शक्ती असल्याचे दिसून येते. 

Web Title: Police need to work on data instead of baton PM Modi said in DG-IG conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.