काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 01:58 PM2018-06-27T13:58:54+5:302018-06-27T14:00:03+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान अहमद दार असे या विशेष पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. इरफान अहमद दार यांच्याकडे एके-47 असून पम्पोर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
Search operation underway for a Special Police Officer (SPO) who went missing after reportedly leaving from Pampore police station with an AK-47 rifle. #JammuAndKashmirpic.twitter.com/iPazJYLChs
— ANI (@ANI) June 27, 2018
दुसरीकडे, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने इरफान अहमद दार हा पोलीस अधिकारी संघटनेत सामील झाल्याचा दावा केला आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा प्रवक्ता बुरहान-उ-दिन याने येथील स्थानिक वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
#JammuAndKashmir: A Special Police Officer goes missing after reportedly leaving from Pampore police station with an AK-47 rifle. More details awaited. pic.twitter.com/wXRytXINTl
— ANI (@ANI) June 27, 2018