पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा

By admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:44+5:302016-04-05T00:15:44+5:30

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले हे सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांसह हुडकोत दाखल झाले. जमावाची आक्रमकता पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस उपअधीक्षक (गृह) महारू पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात पाहणी करून दोन्ही बाजूच्या जमावाला शांततेचे आवाहन केले. काही कालावधीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हेदेखील हुडकोत दाखल झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन दंगा नियंत्रक पथकांनाही पाचारण करण्यात आले होते.

Police Officers and Staff Force | पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा

पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा

Next
नेची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले हे सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांसह हुडकोत दाखल झाले. जमावाची आक्रमकता पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस उपअधीक्षक (गृह) महारू पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात पाहणी करून दोन्ही बाजूच्या जमावाला शांततेचे आवाहन केले. काही कालावधीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हेदेखील हुडकोत दाखल झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन दंगा नियंत्रक पथकांनाही पाचारण करण्यात आले होते.

पोलिसांचे वराती मागून घोडे...
हुडकोत दंगल झाल्यानंतर अर्धा ते एक तासाचा कालावधी उलटूनही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळेच परिस्थिती चिघळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. पोलिसांनी आल्यानंतरही त्वरित कोम्बिंग ऑपरेशनसारखी मोहीम राबवली नाही, असा आरोप करीत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन्ही गटातील तरुणांचे घोळके रस्त्यावर सारखे बाहेर येत होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य न झाल्याने या भागात तणाव कायम होता.

इन्फो-
नागवंशी चौकात जमला शेकडोंचा जमाव
एका गटातील समाजकंटकांनी हुडको पोलीस चौकी ते नागवंशी चौकादरम्यान विद्युत खांबांवर लावलेले राष्ट्रपुरुषाचे बॅनर फाडून टाकले. तसेच शाखा फलकाचीही मोडतोड केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दुसर्‍या गटातील शेकडो नागरिकांनी नागवंशी चौकात ठिय्या मांडला. समाजकंटकांवर अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. पोलीस अधिकार्‍यांनी जमावाची समजूत काढत दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. दोन्ही गटातील ज्येष्ठ व्यक्तींनी पुढे येत संतप्त तरुणांना शांततेचे आवाहन केले.

Web Title: Police Officers and Staff Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.