बडा पोलीस अधिकारी सुट्टी घेऊन गेला; पत्नीच्या तक्रारीनंतर 'भलत्याच' अवस्थेत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:56 PM2021-07-08T17:56:05+5:302021-07-08T17:57:32+5:30

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनं काहीतरी बरंवाईट झाल्याची भीती व्यक्त केल्यानं पोलीस दल कामाला लागलं

police officet Deployed At Unnao Caught With Woman Constable In Hotel Of Kanpur | बडा पोलीस अधिकारी सुट्टी घेऊन गेला; पत्नीच्या तक्रारीनंतर 'भलत्याच' अवस्थेत सापडला

बडा पोलीस अधिकारी सुट्टी घेऊन गेला; पत्नीच्या तक्रारीनंतर 'भलत्याच' अवस्थेत सापडला

googlenewsNext

कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा भलताच प्रकार समोर आला आहे. पोलीस दलात सर्कल अधिकारी असलेली एक व्यक्ती सुट्टी घेऊन घरी गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत अधिकारी घरीच पोहोचले नसल्यानं पत्नीनं पोलीस ठाण्यात फोन केला. यानंतर पोलीस अधिकाऱ्याचं लोकेशन शोधण्यात आलं. अधिकाऱ्याचं लोकेशन पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. त्या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला.

सर्कल अधिकाऱ्यानं पोलीस अधिक्षकांकडे सुट्टी मागितली. त्यानंतर अधिकारी पोलीस ठाण्यातून निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यानं पत्नीनं त्यांना फोन लावले. मात्र त्यांचे नंबर स्विच ऑफ होते. तिनं याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. उन्नाव एसपींनी लगेचच सर्व्हिलान्स टीमला कामाला लावलं. संपूर्ण सर्कलमधील पोलीस दल सीओंचा शोध घेऊ लागलं. सर्व्हिलान्स टीमला सीओंचं लोकेशन कानपूरच्या मॉल रोडजवळच्या हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. पोलिसांनी लगेच तिथे धाव घेतली.

सीओंचं लोकेशन ट्रॅक करत पोलीस हॉटेलपर्यंत पोहोचले. तिथे सीओ एका महिला शिपायासोबत आढळून आले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश एएसपी शशी भूषण यांनी दिले. मूळचे गोरखपूरचे असलेले सीओ उन्नाव जिल्ह्यातल्या ग्रामीण सर्कलमध्ये तैनात होते. त्यांच्याच सर्कलमधील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका शिपाई महिलेशी त्यांची मैत्री होती. गेल्या मंगळवारी सीओ आणि महिला शिपाई सुट्टी घेऊन खासगी कारनं कानपूरमधील मॉल रोडवरील हॉटेलमध्ये पोहोचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील दृश्यांनुसार संध्याकाळी ५ वाजता दोघे हॉटेलमध्ये पोहोचले. दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश करताना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवलं होतं.

पत्नीला बरंवाईट झाल्याचा संशय
सीओ रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्यांच्या पत्नीनं उन्नावच्या पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. पत्नीसोबत काहीतरी बरंवाईट झाल्याचा संशय त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. सर्व्हिलान्स टीमसोबतच संपूर्ण सर्कलमधील पोलीस कर्मचारी कामाला लागले. त्यानंतर पोलिसांनी सीओंचं लोकेशन शोधून काढलं. स्थानिक पोलीस ठाण्यातील एक निरीक्षक आणि दोन शिपायांनी मध्यरात्री हॉटेल गाठलं. तिथे सीओ आणि महिला शिपाई पोलिसांना सापडले.

Web Title: police officet Deployed At Unnao Caught With Woman Constable In Hotel Of Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.