वेतनाअभावी पोलीस कर्मचार्‍यांचे हाल

By Admin | Published: May 21, 2016 11:48 PM2016-05-21T23:48:17+5:302016-05-21T23:48:17+5:30

जळगाव: जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांचे दीड महिन्यापासून पगार झालेले नाहीत. गेल्या चार महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्‍यांना संसाराचा गाडा हाकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार कर्मचारी आहे.तर अधिकार्‍यांची संख्या आणखी वेगळी आहे. राज्यात प्रत्येक जिल्‘ात कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार होत असताना जिल्‘ातच विलंब का? असा प्रश्न कर्मचारी वर्ग विचारु लागला आहे. दरम्यान, विलंबामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्मचारी रोज संबंधित टेबलवर विचारणा करताना दिसून येत आहेत.

Police personnel meeting in absence of salary | वेतनाअभावी पोलीस कर्मचार्‍यांचे हाल

वेतनाअभावी पोलीस कर्मचार्‍यांचे हाल

googlenewsNext
गाव: जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांचे दीड महिन्यापासून पगार झालेले नाहीत. गेल्या चार महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्‍यांना संसाराचा गाडा हाकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार कर्मचारी आहे.तर अधिकार्‍यांची संख्या आणखी वेगळी आहे. राज्यात प्रत्येक जिल्‘ात कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार होत असताना जिल्‘ातच विलंब का? असा प्रश्न कर्मचारी वर्ग विचारु लागला आहे. दरम्यान, विलंबामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्मचारी रोज संबंधित टेबलवर विचारणा करताना दिसून येत आहेत.
पगाराबाबत लावली नोटीस
पोलीस अधीक्षक कार्यालयात पगाराबाबत नोटीस लावण्यात आली आहे. १८ मे नंतरच पगार होतील, असे त्यात म्हटले आहे, मात्र आता २१ तारीख ओलांडली तरी पगार झालेले नाहीत. चार महिन्यापासून वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे. वेतनाचे काम पाहण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आलेले असतानाही वेळेवर कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याचे अनेक कर्मचार्‍यांनी सांगितले. पाच तारखेच्या आत पगार करावेत अशी मागणी होत आहे.
शाळा प्रवेशाची घाई
सध्या शाळा प्रवेशाची प्रक्रीया सुरु आहे, त्यामुळे प्रवेश घेण्यापासून दप्तर व पुस्तके खरेदीसाठी पैशांची नितांत गरज भासत आहे. पोलीस दलात अनेक कर्मचार्‍यांना वेतनाची आठवण येत नसली तरी बहुतांश कर्मचारी वेतनावरच अवलंबून आहेत.

Web Title: Police personnel meeting in absence of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.