दारु पार्टीवर पोलिसांचा छापा, 261 जणांना अटक
By admin | Published: December 23, 2016 12:41 PM2016-12-23T12:41:02+5:302016-12-23T13:07:50+5:30
गुजरातमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या दारु पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 261 जणांना अटक करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. 23 - गुजरातमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या दारु पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 261 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही मोठे उद्योजक, महिला आणि हाय-प्रोफाईल लोकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये इंडियन प्रीमिअर लीगचे (आईपीएल) माजी कमिशनर चिरायु अमीन यांचादेखील समावेश आहे.
पोलिसांनी वडोदरमधील एका फॉर्महाऊसमधून सर्वांना अटक केली आहे. या फॉर्महाऊसमध्ये लग्नाची पार्टी सुरु होती. यावेळी कार्यक्रमात मद्यवाटप केलं जात होतं. गुजरातमध्ये दारुबंदी असतानादेखील दारु प्यायली जात असल्याने सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.
चिरायु अमीन गुजरातचे प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. अलेम्बिक लिमिटेडचे ते चेअरमन आहेत. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 1200 कोटी आहे. आईपीएल कमिशनर व्यतिरिक्त बीसीसीआयचे उपाध्यक्ष पदीदेखील ते होते.
Gujarat: Police detain more than 200 people from a farmhouse, where illegal liquor was being served during a wedding party, near Vadodara. pic.twitter.com/RCIedmS76n
— ANI (@ANI_news) 23 December 2016