काय सांगता? बॉयफ्रेंडसोबत पळून गेली विधवा; पोलिसांनी शोधून काढलं अन् केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:53 PM2023-05-17T15:53:32+5:302023-05-17T16:02:05+5:30

जेव्हा मुस्कानचे सूरजसोबतचे प्रेमसंबंध घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही कुटुंबातील लोकांनी हे नातं मान्य केलं नाही.

police recovered the absconding widow with her lover then do this work | काय सांगता? बॉयफ्रेंडसोबत पळून गेली विधवा; पोलिसांनी शोधून काढलं अन् केलं असं काही...

फोटो - news18 hindi

googlenewsNext

बिहारच्या ब्रह्मपूर येथे पोलिसांनी विधवा महिलेचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिल्याची अनोखी घटना समोर आली आहे. या अनोख्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. ब्रह्मपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रक्षा नगर गावातील विधवा महिला मुस्कान पतीच्या निधनानंतर आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकटीच जीवन जगत होती.

मुस्कानची ओळख याच दरम्यान ब्रह्मपूर गावातील स्थानिक रहिवासी देव कुमार साह यांचा मुलगा सूरज कुमार साह याच्याशी झाली. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांमधील प्रेमसंबंध वाढतच गेले आणि दोघेही फोनवर एकमेकांशी बोलू लागले. मात्र घरातील सदस्यांना हे नातं मान्य नसल्याने दोघंही घरातून पळून गेले.

जेव्हा मुस्कानचे सूरजसोबतचे प्रेमसंबंध घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही कुटुंबातील लोकांनी हे नातं मान्य केलं नाही. यानंतर विधवा महिलेसह तिचा प्रियकर सूरज घरातून पळून झारखंडमधील जमशेदपूर येथे गेला. त्याचवेळी कुटुंबीयांनी दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांना ते दोघेही सापडले. 

दोघांची चौकशी सुरू केली असता हे प्रेम प्रकरण निघाले. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी ब्रह्मपूर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांनी दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. जिथे पोलिसांनी दोन्ही पक्षांना लग्नासाठी तयार केलं. यानंतर दोघांनी प्रसिद्ध बाबा ब्रह्मेश्वरनाथ मंदिरात लग्न केलं.

या विवाहात स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मंदिर समितीच्या लोकांनी पाहुणे बनून सर्व विधी पार पाडल्या. तसेच पोलीस स्टेशन अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांच्या वतीने मंदिरात उपस्थित सर्व लोकांना मिठाई वाटण्यात आली आणि त्यानंतर नववधू मुस्कानला तिच्या नवीन घरी पाठवण्यात आलं. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: police recovered the absconding widow with her lover then do this work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.