मंडप परवान्यासाठी पोलिसांची एनओसी हवी

By admin | Published: September 5, 2015 01:37 AM2015-09-05T01:37:10+5:302015-09-05T01:37:10+5:30

सोलापूर : पोलिसांचा ना हरकत दाखला असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यास परवाने देऊ नका, अशा सूचना आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Police requires NOC for Pavilion license | मंडप परवान्यासाठी पोलिसांची एनओसी हवी

मंडप परवान्यासाठी पोलिसांची एनओसी हवी

Next
लापूर : पोलिसांचा ना हरकत दाखला असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यास परवाने देऊ नका, अशा सूचना आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला उपायुक्त र्शीकांत मायकलवार, सहायक आयुक्त अमिता दगडे?पाटील, प्रदीप साठे, ए. ए. पठाण, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते. सार्वजनिक गणेश मंडळांना स्टेज, मंडप, कमानी परवाना देताना वाहतूक पोलीस व विशेष शाखेचा ना हरकत दाखला असणे बंधनकारक आहे. यासाठी पोलीस आयुक्तालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावेत, बंद दिवे सुरू करावेत, झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे वेळेत पूर्ण करावीत. 13 सप्टेंबर रोजी या कामांची पाहणी केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Police requires NOC for Pavilion license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.