पोलीस उपायुक्तांच्या वडिलांना लुटले
By admin | Published: March 23, 2017 05:19 PM2017-03-23T17:19:37+5:302017-03-23T17:19:37+5:30
पोलीस उपायुक्तांच्या वडिलांना लुटले
Next
प लीस उपायुक्तांच्या वडिलांना लुटले नागपूर : पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांचे वडिलांचे दीड लाख रुपये लुटण्यात आले. हा धक्कादायक प्रकार सिव्हील लाईन्स येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर दुपारी घडला.झोन एकच्या डीसीपी मासिरकर यांचे वडील रविचंद्र मासिरकर (५९) हे सेवानिवृत्त वन अधिकारी आहेत. ते बुधवारी दुपारी १२ वाजता बँकेतून पैसे काढून आपल्या दुचाकीने सिव्हील लाईन्स येथील आपल्या मुलीच्या घरी जात होते. त्याचवेळी बाईकवर आलेल्या दोन युवकांनी त्यांना त्यांची दुचाकी पंक्चर झाल्याचे सांगितले. मासिरकर यांनी गाडी थांबवली व ते गाडी पंक्चर झाली का म्हणून खाली वाकून पाहू लागले. त्याचवेळी लुटारू त्यांची पैशाची बॅग हिसकावून पळाले. मासिरकर यांनी लगेच आपल्या मुलीला फोनवर माहिती दिली. यानंतर सदर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. शहरातील आयपीएस अधिकाऱ्याच्या वडिलांना लुटण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांची बोलतीही बंद झाली आहे. लुटारुंनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नव्हता.