त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तिघांना अटक; थोडक्यात बचावले होते CM
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 03:46 PM2021-08-07T15:46:39+5:302021-08-07T15:47:22+5:30
संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाले. या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
अगरतळा - त्रिपुराचेमुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले, की मुख्यमंत्री गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे शासकीय निवासस्थान श्यामाप्रसाद मुखर्जी लेनजवळ फिरायला गेले होते, तेव्हाच कारमधील तीन जण त्यांच्या सुरक्षा घेऱ्यात घुसले.
यावेळी, संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाले. या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकाने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
योगी आदित्यनाथ यांच्या 'बेलगाम घोडा' वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा, विचारला असा प्रश्न
आरोपी 14 दिवसांच्या रिमांडवर -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर तीन जणांना केरचाऊमुहानी येथून अटक करण्यात आली असून त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे. यानंतर आरोपींना शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी पीपी पॉल यांच्या समोर उभे करण्यात आले. यानंतर त्यांना 14 दिवसांच्या रिमांडवर तुरुंगात पाठविण्यात आले आहे. सहाय्यक सरकारी वकील विद्युत सूत्रधर यांनी सांगितले, की हे तीनही आरोपी 20 वर्षांपेक्षा मोठे आहेत. मात्र, त्यांचा हेतू आद्याप समजू शकलेला नाही.
सूत्रधार यांनी सांगितले, की 'आम्ही चौकशीसाठी आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 19 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता पोलीस त्यांची चौकशी करून त्यांचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.'
धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल