एस.पी.कार्यालयातच दे-दणादण पोलिसांचा धाक संपला : शहरात भर रस्त्यावर चार ठिकाणी हाणामारी, एक विद्यार्थी जखमी
By admin | Published: January 19, 2016 11:04 PM2016-01-19T23:04:22+5:302016-01-19T23:04:22+5:30
जळगाव: पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय कक्षात आलेल्या तडजोडीसाठी आलेल्या पती-पत्नीच्या वादातून मेहुणे व शालक यांच्यातच जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. यात खुर्च्यांचीही फेकाफेक झाली. यावेळी एकही पुरुष पोलीस उपस्थित नसल्याने हा प्रकार पाहून सहाय कक्षातील महिलाही भेदरल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय,ओंकारेश्वर मंदिर व जिल्हा क्रीडा संकुलाजवळही हाणामारीच्या घटना घडल्या. शहरात भररस्त्यावर तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात हाणामारीच्या घटना घडत असल्याने पोलिसांचा धाक संपल्याचे यातून अधोरेखित होते.
Next
ज गाव: पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय कक्षात आलेल्या तडजोडीसाठी आलेल्या पती-पत्नीच्या वादातून मेहुणे व शालक यांच्यातच जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. यात खुर्च्यांचीही फेकाफेक झाली. यावेळी एकही पुरुष पोलीस उपस्थित नसल्याने हा प्रकार पाहून सहाय कक्षातील महिलाही भेदरल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय,ओंकारेश्वर मंदिर व जिल्हा क्रीडा संकुलाजवळही हाणामारीच्या घटना घडल्या. शहरात भररस्त्यावर तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात हाणामारीच्या घटना घडत असल्याने पोलिसांचा धाक संपल्याचे यातून अधोरेखित होते.जामनेर येथील उपशिक्षकाचे तालुक्यातील एका गावातील तरुणीशी दहा वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र दोघांमध्ये बिनसल्याने पत्नी माहेरी गेली होती. पत्नी नांदायला येत नाही म्हणून शिक्षकाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय कक्षाकडे २९ ऑक्टोबर २०१५ रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या आधारावर या कक्षात पाच वेळा दोघांना बोलावण्यात आले होते, परंतु तडजोड होत नव्हती. मंगळवारी तडजोड होणार असल्याने शिक्षक हा त्याच्या एका शिक्षक मित्राला सोबत घेऊन येथे आला होता. तर पत्नी भाऊ, मामा व अन्य नातेवाईकासह आली होती. दोघांमध्ये वाद सुरूच होता. शिक्षक व पत्नीच्या भावात शाब्दिक वाद झाले. त्याचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. दोघांमध्ये जोरदार हाणामारी होत असल्याने कक्षातील महिला कर्मचारी भेदरल्या. कायदेशीर कारवाईचा दम दिल्यानंतर हाणामारी थांबली.हाणामारीचा शेवट पेढ्यांनी केला गोडया हाणामारीप्रसंगी सहायक फौजदार ललिता बनसोडे, वंदना अंबीकर, वैशाली पाटील व सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी शिक्षकाला कायद्याचे डोस पाजून होणार्या परिणामाची काही उदाहरणासह जाणीव करून दिली. त्यामुळे संतापात असलेली दोन्हीकडील मंडळी वठणीवर आली. शिक्षकाने पत्नीला नांदवण्यास तयारी दर्शविली तर पत्नीनेही त्याला संमती दिली, मात्र दोघांना लेखी हमीची अट टाकली. ती अट पूर्ण करून पती-पत्नीने एकमेकाला पेढे भरवून तोंड गोड केले. हाणामारीचा शेवट पेढ्यांनी गोड झाला. नंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनलाही दिलेला अर्ज मागे घेण्यात आला.