पुरंदरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त
By admin | Published: August 19, 2015 01:44 AM2015-08-19T01:44:20+5:302015-08-19T01:44:20+5:30
Next
>पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त आज सायंकाळनंतर ठेवण्यात आला. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिले जाऊ नये या मागणीसाठी राज्यात आज काही ठिकाणी हिंसक प्रकार झाले. स्वत: पुरंदरे मुंबईस रवाना झाले आहेत. मात्र हिंसक घटनांचे पडसाद त्यांच्या निवासस्थानावर उमटू नयेत यासाठी २० ते २५ पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे गुन्हे निरिक्षक राम राजमाने यांनी या माहितीस दुजोरा देऊन सांगितले की त्यांच्या घरावर पुर्वीही साध्या वेषातील पोलिसांचा बंदोबस्त होता, आज त्यात वाढ करण्यात आली आहे.-------- फर्ग्युसन परिसरात घरफोडीपुणे : फर्ग्युसन परिसरातील नामदार गोखले रस्त्यावरील एका सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप तोडून चोरांनी दागिने व चांदीच्या वस्तु असा ८ ते १० लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविला. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. दिलीप विलास अरगडे (पुष्पाली अपार्टमेंट, परांजपे रस्ता, शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद केली. ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. सोमवारी ते बाहेरगावी गेले होते. फ्लॅटचे कुलुप तोडून चोरांनी २० ते २५ तोळे दागिने, दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तु असे एवज लंपास केला. आज दुपारी अरगडे घरी परतल्यावर चोरीचा प्रकार त्यांना समजला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. उच्चभ्रू भागात घरफोडी झाल्याने वैशाली हॉटेल परिसरात घबराट झाली.