वर्षभरापासून घरात बंद होत्या 2 बहिणी; 'या' भीतीपोटी स्वतःला ठेवलं कोंडून, झाली भयंकर अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 10:31 AM2023-05-11T10:31:15+5:302023-05-11T10:32:29+5:30

एक वर्षापासून घरात बंदिस्त असलेल्या दोन बहिणींची सुटका करण्यात आली आहे.

police social organizations rescued two sisters who were locked up in house for one year | वर्षभरापासून घरात बंद होत्या 2 बहिणी; 'या' भीतीपोटी स्वतःला ठेवलं कोंडून, झाली भयंकर अवस्था

फोटो - आजतक

googlenewsNext

हरियाणातील पानिपतमध्ये एक वर्षापासून घरात बंदिस्त असलेल्या दोन बहिणींची सुटका करण्यात आली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर दोन्ही बहिणींनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. दोन मुलींपैकी एका मुलीच्या शरीरावर कपडे नव्हते. तर दुसरीचे मानसिक संतुलन ठीक वाटत नव्हते. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सामाजिक संस्थांसोबत मिळून पानिपतच्या कायस्थान परिसरातून एका वर्षापासून घरात बंदिस्त असलेल्या दोन बहिणींची सुटका केली. 

सुटका झालेल्या दोन्ही बहिणींचे मानसिक संतुलन ठीक नाही. घरात बंद असलेली मुलगी विवस्त्र अवस्थेत आढळली. दोघांच्याही अंगावर शेकडो जखमा होत्या. घरात अस्वच्छता होती, त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. स्थानिक लोकांनी सांगितले की, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही बहिणींना घराचा ताबा नातेवाईक घेतील अशी भीती वाटत होती. या भीतीपोटी दोन्ही बहिणींनी स्वतःला घरात कैद करून घेतलं होतं.

मुलीचे कुटुंब सुशिक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बहिणींनी एमएचे शिक्षण घेतले आहे. वर्षभरापूर्वी दोघीही खासगी नोकरी करत होते. पोलिसांच्या पथकाने दोघांचीही सुटका केली, त्यानंतर घराचा कोणी ताबा घेईल या भीतीने दोघींनी कुलूपांच्या चाव्या मागितल्या. बचावल्यानंतर धाकटी बहीण घराला कुलूप लावा असे ओरडत होती. कुलूप लावल्यानंतर तिला चावी दिली असता ती शांत झाली.

सुटका करण्यात आलेली मोठी बहीण सोनियांचा पाठीचा कणा तुटला होता, त्यामुळे ती बेडवर पडली होती. घरात अस्वच्छता असल्याने दुर्गंधी पसरल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर त्यांनी पोलीस व सामाजिक संस्थांना माहिती दिली. बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यावर ते छतावरून आत पोहोचले. घरात अस्वच्छता होती.या दोघींपैकी छोटी बहीण खिडकीजवळ यायची आणि ये-जा करणाऱ्यांना पैसे देऊन दुकानातून सामान मागवायची, असे स्थानिक लोक सांगतात. त्यानंतर ती खिडकी बंद करायची.

पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मुलींनी दरवाजा उघडला नाही. दरम्यान, पोलीस आणि सामाजिक संस्थांचे लोक खिडकीतून मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिले, मात्र दोघीही बोलल्या नाहीत. शेजारी राहणाऱ्या सुनीता वर्मा यांनी सांगितले की, जेव्हा संशय आला तेव्हा त्यांनी आपल्या पतीला सांगितले की शेजारच्या घरात दोन बहिणी दयनीय अवस्थेत आहेत. आपण त्यांना मदत केली पाहिजे. याबाबत सुनीताचे पती मनमोहन वर्मा यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सामाजिक संघटना जनसेवा दलालाही पाचारण करण्यात आले. सुमारे 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर संस्थेच्या सदस्यांनी छतावरून घर गाठले आणि दोन्ही बहिणींची सुटका करण्यात आली.
 

Web Title: police social organizations rescued two sisters who were locked up in house for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.