पोलीस उपनिरीक्षक, वकिलासह तिघांचा इनकॅमेरा जबाब सादरे आत्महत्या प्रकरण : जळगावातील अन्य दोघांनाही नोटिसा
By admin | Published: January 31, 2016 12:16 AM2016-01-31T00:16:04+5:302016-01-31T00:16:04+5:30
जळगाव: रामानंद नगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी रामानंदचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सादरे यांचे वकील विजय दाणेज व बुलढाण्याचे सहायक उपनिबंधक निलेश साबळे आदींचा गुरुवारी नाशिक न्यायालयात इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबासाठी जळगावात आणखी दोनजणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र ते दोघंही गैरहजर राहिले.
Next
ज गाव: रामानंद नगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी रामानंदचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सादरे यांचे वकील विजय दाणेज व बुलढाण्याचे सहायक उपनिबंधक निलेश साबळे आदींचा गुरुवारी नाशिक न्यायालयात इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबासाठी जळगावात आणखी दोनजणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र ते दोघंही गैरहजर राहिले.सादरे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू व्यावसायिक सागर चौधरी यांच्यावर पंचवटी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. सध्या हा तपास सीआयडीकडे आहे. मध्यंतरी सीआयडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची कोल्हापुरला बदली झाल्यानंतर हे प्रकरण काही अंशी शांत झाले होते. नवीन अधीक्षकपदी रमेश गायकवाड २५ जानेवारीला रुजू झाल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा गती देण्यात आली. जळगावात चारजणांना नोटिसाया चौकशीचा एक भाग म्हणून सीआयडीने जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सादरे यांचे वकील विजय दाणेज, पत्रकार आनंद शर्मा व अन्य एका जणाला नोटीस बजावून २८ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या चौघांसह सादरे यांचे मित्र तत्कालीन उपनिरीक्षक व बुलढाण्याचे विद्यमान सहायक उपनिबंधक नीलेश साबळे यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. कलम १६४ अन्वये नोंदविला जबाबपाटील, ॲड.दाणेज व साबळे यांचा न्या.किशोर वसावे यांच्या न्यायालयात कलम १६४ अन्वये इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. दाणेज यांचा तब्बल दोन तास तर पाटील यांचा अर्धा तास जबाब सुरु होता. साबळे यांचाही जवळपास २० मिनिटे जबाब नोंदविण्यात आला. सीआयडीचे उपअधीक्षक तथा तपासाधिकारी के.डी.पाटील व अन्य दोन अधिकार्यांनी तिघांना सकाळी अकरा वाजता न्यायालयात नेले होते. तीन वाजेनंतर प्रत्यक्ष जबाबाला सुुरुवात झाली.