जोडप्याचं कारमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य; पोलिसांचा हस्तक्षेप अन् पुढं झालं ते भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:52 PM2024-01-25T16:52:15+5:302024-01-25T16:52:36+5:30

प्रेमी युगुलाने पोलिसावर कार चालवल्याची घटना घडली आहे.

Police sub-inspector Mahesh stopped a couple having sex in a car in Bengaluru when the couple ran over them | जोडप्याचं कारमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य; पोलिसांचा हस्तक्षेप अन् पुढं झालं ते भयंकर

जोडप्याचं कारमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य; पोलिसांचा हस्तक्षेप अन् पुढं झालं ते भयंकर

कारमध्ये अश्लील कृत्य करत असलेल्या प्रेमी युगुलानं पोलिसांवर कार चालवल्याची घटना घडली आहे. बंगळुरू येथील या धक्कादायक घटनेनंं सर्वांचं लक्ष वेधलं. येथील एका पार्कमध्ये प्रेमी युगुल कारमध्ये अश्लील कृत्य करत होते. कारमधील संपूर्ण दृश्य तिथून ये-जा करणाऱ्या लोकांना दिसत होते. हे पाहून पोलीस त्यांना थांबवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांच्यावर कार चालवली. प्रेमी युगुलाच्या या कृत्यामुळं एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. प्रेमी युगुलानं गाडी अंगावर घालून तिथून पळ काढला.

दरम्यान, जखमी पोलीस उपनिरीक्षक महेश यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस कार आणि आरोपींचा शोध घेत आहेत. हे प्रकरण बंगळुरूच्या ज्ञानभारती पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील एका पार्कमध्ये प्रेमी युगुल सार्वजनिक ठिकाणी कार पार्क करून रोमान्स करत होते. 

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य
दुपारच्या सुमारास पार्कजवळ एक गाडी थांबली. त्यामध्ये एक तरूण आणि तरूणी होती. अचानक त्यांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करण्यास सुरुवात केली. प्रेमी युगुलाची आक्षेपार्ह कृती तिथून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. त्यानंतर तिथे तैनात असलेले उपनिरीक्षक महेश यांच्या या जोडप्याच्या लज्जास्पद कारवाया लक्षात आल्या. गाडीतील प्रेमी युगुलाला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या प्रेमी युगुलानं उपनिरीक्षकांवर गाडी घातली. 

तत्पुर्वी, पोलिसांनी गाडीजवळ जाऊन नंबर प्लेट तपासायला सुरुवात केली. मग कारमधील तरूणानं अचानक कार त्यांच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. गाडीचा वेग जास्त असल्याने उपनिरीक्षक त्याच्या बोनेटवर पडले. आरोपी चालक तरुणानं गाडी रिव्हर्स गिअरमध्ये लावली आणि पुन्हा गाडीचा वेग वाढवला त्यामुळे उपनिरीक्षक खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पार्कमध्ये एकच खळबळ माजली. गाडी थांबवण्यासाठी लोकांनी गाडीच्या मागे धाव घेतली मात्र प्रेमी युगुलानं तिथून पळ काढला. 

Web Title: Police sub-inspector Mahesh stopped a couple having sex in a car in Bengaluru when the couple ran over them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.