‘तामिळनाडूचे पोलीस, सरकार कठपुतळीचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:55 AM2018-09-12T03:55:02+5:302018-09-12T03:55:05+5:30
तामिळनाडूचे पोलीस, सरकार हे कठपुतळीचे सरकार आहे, असे स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले.
चेन्नई : तामिळनाडूचे पोलीस, सरकार हे कठपुतळीचे सरकार आहे, असे स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले. नियोजित सालेम-चेन्नई एक्स्प्रेसवेमुळे जे शेतकरी बाधित होतील त्यांना भेटून आल्यानंतर यादव म्हणाले, हे कठपुतळीचे सरकार काही कंत्राटदारांच्या व काही कंपन्यांच्या फायद्यासाठी पोलिसांचा वापर खासगी लष्कर म्हणून करीत आहे. यात लोकांचे हित काहीच नाही, हे तर स्पष्टच आहे. मी कार्यकर्ता असतानाच्या दिवसांत शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी मला कधीही अडवण्यात आले नाही, असे यादव म्हणाले. प्रकल्पावरून राज्य सरकार खूपच निराश झाल्याचे दिसते, असे सांगून योगेंद्र यादव यांनी मला दोन दिवसांपूर्वी पोलीस अधिकाºयांनी स्थानबद्ध केले होते व मुख्यमंत्र्यांचे कार्यालय या अधिकाºयांकडून अद्ययावत माहिती घेण्यासाठी दर दहा मिनिटांनी त्यांच्या संपर्कात होते, असा आरोप केला. (वृत्तसंस्था)