पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी बंद होणार?
By admin | Published: September 5, 2014 02:02 AM2014-09-05T02:02:20+5:302014-09-05T09:31:35+5:30
सरकारी नोक-यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तसेच पासपोर्टसाठी अर्ज करणा-यांना पोलीस पडताळणीतून सवलत देण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार विचार करीत आह़े
Next
नवी दिल्ली : शासकीय नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अनिवार्य असलेली पोलीस पडताळणी बंद होण्याची शक्यता आह़े पोलीस पडताळणीऐवजी या उमेदवारांना स्वसाक्षांकित प्रमाणपत्रस मान्यता देण्यावर केंद्राने विचार चालवला आह़े
गृहमंत्रलयाच्या सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी नोक:यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तसेच पासपोर्टसाठी अर्ज करणा:यांना पोलीस पडताळणीतून सवलत देण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार विचार करीत आह़े केंद्रीय गृहमंत्रलय या मुद्यावर राज्य सरकारे आणि संबंधित पक्षांचे विचारही जाणून घेऊ शकत़े
कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रलयानेही यासंदर्भात एक ‘कॉन्सेप्ट नोट’ तयार केली आह़े त्यात सरकारी नोक:या आणि पासपोर्ट प्रक्रियेतील पोलीस पडताळणी रद्द करून त्याऐवजी दुसरी व्यवस्था आणण्याची शिफारस केली आह़े या मंत्रलयाने आपल्या नोटमध्ये तीन बाबींकडे लक्ष वेधले आह़े एक म्हणजे, व्यक्ती एखाद्या गुनशी संबंधित असेल वा त्याने चुकीच्या घोषणा केलेल्या असतील तरच पोलीस पडताळणी केली जावी़ दुसरी म्हणजे, पोलीस पडताळणी फारशी गंभीरपणो केली जात नाही़ पोलीस केवळ संबंधित व्यक्तीच्या अंतिम निवासस्थानाचा पत्ता लावत़े पोलीस पडताळणीत संबंधित उमेदवाराच्या शेजा:याची भूमिका कमी असत़े सरकारी सेवांमधील सुधारणांसाठी सरकार नोटरीकृत प्रतिज्ञापत्रंऐवजी स्वसाक्षांकनास चालना देत आह़े पंतप्रधानांनी अलीकडे सामान्यांच्या सोयीसाठी प्रतिज्ञापत्रंचा कमीत कमी वापर करण्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)