सोमनाथ भारतींना पकडायला गेलेले पोलिस चक्क कुत्रा घेऊन परतले
By admin | Published: September 25, 2015 08:17 PM2015-09-25T20:17:51+5:302015-09-25T20:18:04+5:30
कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले आप नेते सोमनाथ भारती यांच्या शोधमोहीमेला आता वेग आला असून शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारतींच्या निवासस्थानी धडक दिली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले आप नेते सोमनाथ भारती यांच्या शोधमोहीमेला आता वेग आला असून शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारतींच्या निवासस्थानी धडक दिली. सोमनाथ भारती घरातून पसार झाले असले तरी पोलिसांनी थेट सोमनाथ भारतींच्या कुत्र्यालाच ताब्यात घेतले आहे.
सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने हत्येचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळ व कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यापासून सोमनाथ भारती अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक भारतींचा कसून शोध घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांच्या पथकाने भारतींच्या निवासस्थानी धडक दिली. सोमनाथ भारती सापडले नसले तरी पोलिसांनी सोमनाथ भारतींचा पाळीव कुत्रा 'डॉन'ला ताब्यात घेतले आहे.
सोमनाथ भारतींनी त्यांच्या कुत्र्याला चावा घ्यायला लावल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला होता. काही दिवसांपूर्वी सोमनाथ भारती हे कुत्र्यासोबत पोलिस ठाण्यातही हजर झाले होते.