प्रेमविवाहामुळे कुटुंबीय नाराज, मृत्यूनंतरही पाहिलं नाही तोंड; 2 वर्षांच्या लेकाने दिला मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:23 AM2023-05-25T09:23:38+5:302023-05-25T09:35:36+5:30

सचिन सिंह यांनी मृत तरुणाच्या दोन वर्षाच्या निष्पाप मुलाला आपल्या कडेवर घेऊन मुखाग्नी दिला आहे. 

policemen performed the last rites husband deadbody manendragarh chhattisgarh | प्रेमविवाहामुळे कुटुंबीय नाराज, मृत्यूनंतरही पाहिलं नाही तोंड; 2 वर्षांच्या लेकाने दिला मुखाग्नी

फोटो - सोशल मीडिया

googlenewsNext

छत्तीसगडमधील मनेंद्रगड जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी मृत तरुणाच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी कुटुंबातील कोणीही सदस्य आले नाहीत. यानंतर पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सचिन सिंह यांनी मृत तरुणाच्या दोन वर्षाच्या निष्पाप मुलाला आपल्या कडेवर घेऊन मुखाग्नी दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर येथील निक्की वाल्मिकी आणि कोरबा येथील सविता यांचा आंतरजातीय विवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. मनेंद्रगडनंतर रायपूरमध्ये राहून हे दोघं मजूर म्हणून काम करू लागले.

काही दिवसांपासून निक्कीची तब्येत बिघडत होती. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होत होता. मालकाने पती-पत्नीला वाहनात बसवून मनेंद्रगडला पाठवले. पण, वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला. त्यानंतर चालकाने निक्कीच्या मृतदेहासह पत्नीला बिलासपूर रतनपूरजवळ रस्त्याच्या कडेला टाकले. 

आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने सवितने पतीचा मृतदेह घेऊन हॉस्पिटल गाठले. शवविच्छेदनानंतर मृताचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मनेंद्रगड येथे पाठवण्यात आला. सविता पतीच्या मृतदेहासोबत उभी होती. त्यानंतर काही पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याची चौकशी केली. तिने सांगितले की पतीचा मृत्यू झाला आहे आणि तिच्याकडे मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी पैसेच नाहीत

सविताने पोलिसांना सांगितले की, अंत्यसंस्कारासाठी तिच्याकडे एक रुपयाही नाही. पोलिसांनी या घटनेची माहिती स्टेशन प्रभारींना दिली. यानंतर स्टेशन प्रभारी सचिन सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. ज्याने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: policemen performed the last rites husband deadbody manendragarh chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.