एस.पी.कार्यालय आवारातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांची तारांबळ : वरिष्ठ अधिकार्यांना भेटू न दिल्याने घेतला निर्णय
By admin | Published: October 22, 2016 10:23 PM2016-10-22T22:23:02+5:302016-10-22T22:23:02+5:30
जळगाव: मारहाणीची तक्रार करूनही त्याची पोलीस स्टेशनला दखल घेण्यात आली नाही,तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांनाही भेटण्यास मज्जाव केल्याने संतप्त तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. राम तमायचेकर (रा.जाखनी नगर, जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता ही घटना घडली.
Next
ज गाव: मारहाणीची तक्रार करूनही त्याची पोलीस स्टेशनला दखल घेण्यात आली नाही,तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांनाही भेटण्यास मज्जाव केल्याने संतप्त तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. राम तमायचेकर (रा.जाखनी नगर, जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता ही घटना घडली.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, राम तमायचेकर याला निर्मला बिरजू भाट, विशाल बिरजू भाट व विना बिरजू भाट या तिघांकडून दोन दिवसापासून मारहाण होत आहे. राम याची पत्नी मिना तमायचेकर यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रारही दिली. त्याची अदखलपात्र नोंद करण्यात आली. या तक्रारीनंतरही त्रास सुरुच आहे तर पोलिसांनी मारहाण करणार्यावर कुठलीच कारवाई केली नाही असा आरोप तमायचेकर पती-पत्नीने केला.अन् संतापात चढला झाडावरमारहाण करणार्यावर कारवाई होत नसल्याने राम हा पत्नी मिना व दोन मुलांसह संध्याकाळी साडे पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आले, मात्र त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. आम्हाला कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याला भेटू द्या, अशी मागणी राम व त्याची पत्नीने केली,परंतु त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे राम हा संतापात धावत जाऊन झाडावर चढला व सोबत आणलेली दोरी गळ्यात गुंडाळली, हा प्रकार लक्षात येताच त्याच्यासोबतच्या लोकांसह पोलिसांनी धाव घेत लटकण्याच्या आत त्याला झाडाच्या खाली ओढले.उपअधीक्षकांसमोर केले हजरया घटनेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातून निरोप येताच जिल्हा पेठचे हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील, छगन तायडे यांनी घटनास्थळ गाठले. त्याला ताब्यात घेऊन वाहनात बसवत असतानाही त्याने गोंधळ घातला. त्यानंतर पती-पत्नीला नियंत्रण कक्षात नेण्यात आले. एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. बाहेर नेत असताना उपअधीक्षक सचिन सांगळे कार्यालयात दाखल झाले, त्यामुळे दोघांना त्यांच्यासमोर हजर करण्यात आले.कोट.. तो तरुण नशेत होता, शिवाय पैशावरून त्यांचा खासगी वाद आहे. तसेच त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत.तरीही संबंधित व्यक्तीच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे. दिवाणी बाब असल्याने त्याची समजूत घालण्यात आली. -सचिन सांगळे, पोलीस उपअधीक्षक