पोलिसांच्या ‘मन की बात’चा सुरतच्या मॉक ड्रिलमध्ये पर्दाफाश

By admin | Published: January 1, 2015 03:04 AM2015-01-01T03:04:23+5:302015-01-01T03:04:23+5:30

सुरतमधील पोलिसांनी बुधवारी दहशतवादविरोधी लढाईचे प्रात्यक्षिक मॉक ड्रिलच्या माध्यमातून सादर केले.

Police's 'Man Ki Baat' busted in Surat's mock drill | पोलिसांच्या ‘मन की बात’चा सुरतच्या मॉक ड्रिलमध्ये पर्दाफाश

पोलिसांच्या ‘मन की बात’चा सुरतच्या मॉक ड्रिलमध्ये पर्दाफाश

Next

सुरत : सुरतमधील पोलिसांनी बुधवारी दहशतवादविरोधी लढाईचे प्रात्यक्षिक मॉक ड्रिलच्या माध्यमातून सादर केले. हे प्रात्यक्षिक सादर करताना दहशतवादी बनलेल्या युवकाला डोक्यावर फिट बसणारी खास प्रकारची टोपी देण्यात आली. ही टोपी एका समाजाची निदर्शक असल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले असून, यातून पोलिसांची मानसिकता उघड झाल्याचे बोलले जात आहे. दहशतवादीविरोधी लढाईसाठी पोलिसांची तयारी पाहण्यासाठी या कवायतींचे आयोजन करण्यात आले होते. सुरत ग्रामीण पोलिसांनी ही कवायत आयोजित केली होती.
त्यासाठी एक पोलिस अधिकारी व दहशतवादी बनलेले दोन नागरिक नाट्यात सहभागी झाले होते. दहशतवादी बनलेल्या लोकांना खास डोक्याला बसणाऱ्या टोप्या देण्यात आल्या होत्या. या टोप्या मुस्लीम समाजाचे निदर्शक असल्याने वाद उफाळला. सुरत पोलिसांनी यासंदर्भात खेद व्यक्त करण्यास नकार दिला, पण हा वाद टाळता येण्यासारखा होता,हे मान्य केले. संबंधित पोलिस ठाण्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, प्रसारमाध्यमांनी या घटनेचा गवगवा करु नये असे सांगण्यात आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार या भागात राहणारे लोक असाच पोशाख करतात, त्यामुळे कोणत्याही समाजाचा उल्लेख करण्यासाठी पोशाखाची निवड केली नव्हती. पण राजकीय पक्षांनी हा मुद्दा लगेचच उचलला असून गुजरातमधील भाजपा सरकारवर शरसंधान सुरु झाले आहे. जदयूचे नेता अली अन्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. राज्यात अजूनही अशा घटना घडताना दिसतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. यामुळे लोकांची मानसिकता उघड झाली. दहशतवादाची सांगड कोणत्याही धर्माशी घालू नये.

च्काँग्रेसचे रशिद अल्वी यासंदर्भात बोलताना म्हणाले, दहशतवाद कोणत्याही धर्माशी निगडीत नसतो, तसे दाखवणे गैर आहे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा घटनामुळेच दहशतवादाला बळ मिळते.

 

Web Title: Police's 'Man Ki Baat' busted in Surat's mock drill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.