इंजेक्शनद्वारे पोलिओ लसीकरण

By Admin | Published: September 2, 2015 11:32 PM2015-09-02T23:32:20+5:302015-09-02T23:32:20+5:30

बालकांना सध्या तोंडात थेंब टाकून दिली जाणारी पोलिओ लस येत्या नोव्हेंबरपासून इंजेक्शनने दिली जाणार आहे. इंजेक्शनद्वारे पोलिओ लसीकरणास सुरुवात केली जाणार

Polio Vaccination by Injection | इंजेक्शनद्वारे पोलिओ लसीकरण

इंजेक्शनद्वारे पोलिओ लसीकरण

googlenewsNext

नवी दिल्ली : बालकांना सध्या तोंडात थेंब टाकून दिली जाणारी पोलिओ लस येत्या नोव्हेंबरपासून इंजेक्शनने दिली जाणार आहे. इंजेक्शनद्वारे पोलिओ लसीकरणास सुरुवात केली जाणार असली तरी तोंडात थेंब टाकून दिली जाणारी लसही सुरू राहणार आहे. पोलिओ विषाणूपासून बचाव करण्याच्या उद्देशाने हे लसीकरण केले जाते.
सध्या भारतात ट्रिपल पोलिओ लस दिली जाते. येत्या नोव्हेंबरपासून भारतात पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत टप्प्याटप्प्याने इंजेक्शनने पोलिओ लसीकरण (आयपीव्ही) सुरू करण्यात येईल. गेल्या जानेवारी २०१४ मध्ये पोलिओ विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यात यश आले होते.
पोलिओ लसीकरणाबद्दल भारताचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. शेजारील पाकिस्तानात मात्र पोलिओ लसीकरणाची अत्यंत दयनीय स्थिती आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Polio Vaccination by Injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.