यूपीत राजकीय हालचालींना वेग, अखिलेश यांनी घेतली राज्यपाल राम नाईकांची भेट
By admin | Published: October 26, 2016 05:52 PM2016-10-26T17:52:11+5:302016-10-26T17:52:11+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नुकतीच राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 26 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नुकतीच राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली आहे. उत्तर प्रदेशमधल्या उफाळलेल्या यादवीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. अखिलेश यादव यांनी दबावतंत्र बनवण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर काहींच्या मते पवन पांडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केल्याप्रकरणी ही भेट घेतली आहे. तर राज्यपालांनी उत्तर प्रदेशमध्ये कोणतेही संवैधानिक संकट नसल्याचं माहिती दिली आहे.
याआधी शिवपाल यांनी सपाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रामगोपाल यादव यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अखिलेश यादव यांनी आज मंत्री आणि आमदारांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीत 3 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या निवडणूक रथयात्रेवर चर्चा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
तर दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला पक्षातून बाहेर केले आहे. शिवपाल यांनी वन राज्यमंत्री तेज नारायण पांडे ऊर्फ पवन पांडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले आहे. त्यांच्यावर पक्षाच्या एमएलसी आशु मलिक यांना मारहाण आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिवपाल यादव सरकारी घर सोडल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे