राजकीय पक्षांचा ‘हिशेब’ : बहुतांश देणग्या ‘निनावी’, पूर्वीपेक्षा देणग्यांची रक्कम रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:51 AM2017-09-08T01:51:25+5:302017-09-08T01:52:04+5:30

देशातील भाजपा व काँग्रेस या राजकीय पक्षांना मिळालेल्या उत्पन्नातील अनुक्रमे ८१ व ७१ टक्के वाटा निनावी देणग्यांचा होता, असे उघडकीस आले आहे.

 Political parties 'accounting': Most donations 'anonymous', the amount of donation paid before | राजकीय पक्षांचा ‘हिशेब’ : बहुतांश देणग्या ‘निनावी’, पूर्वीपेक्षा देणग्यांची रक्कम रोडावली

राजकीय पक्षांचा ‘हिशेब’ : बहुतांश देणग्या ‘निनावी’, पूर्वीपेक्षा देणग्यांची रक्कम रोडावली

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील भाजपा व काँग्रेस या राजकीय पक्षांना मिळालेल्या उत्पन्नातील अनुक्रमे ८१ व ७१ टक्के वाटा निनावी देणग्यांचा होता, असे उघडकीस आले आहे.
विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या उत्पन्न व खर्चाच्या विवरणपत्रांचे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक
राइट््स’ (एडीआर)ने विश्लेषण केले असून, त्यानुसार संबंधित वर्षांत भाजपाने ५७०.८३ कोटींचे उत्पन्न जाहीर केले. त्यापैकी ४६०.७८ कोटी निनावी देणगीदारांकडून मिळाले. याच वर्षात काँग्रेसने २६१.५६ कोटी उत्पन्न जाहीर केले. त्यात निनावी देणग्या होत्या १८६.०४ कोटी रुपयांच्या.
कायद्यानुसार राजकीय पक्षांना २० हजार रुपयांहून अधिक रकमेच्या रकमा चेकने घेणे व त्याची पावती देणे बंधनकारक आहे. त्याहून कमी रकमेच्या देणग्या ‘निनावी देणग्या’ वर्गात मोडतात. भाजपाला ज्ञात देणगीदारांकडून (म्हणजेच २० हजार रुपयांहून जास्तीच्या देणग्या) मिळालेली रक्कम ७६.८५ कोटी होती. काँग्रेसला नावानिशी मिळालेल्या देणग्या २०.४२ कोटी रुपयांच्या होत्या. अन्य मार्गाने भाजपाला ३३.२३ कोटी रुपये, तर काँग्रेसला ५५.१० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. आधीच्या वर्षाशी तुलना करता, या दोन्ही पक्षांचे उत्पन्न या वर्षात कमी झाल्याचेही दिसते.
नेत्यांची संपत्ती वाढते कशी?
लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत होणाºया वाढीवरून सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून, केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. २८९ नेत्यांच्या मालमत्तेचे एक प्रकरण न्यायालयापुढे आहे. त्यात काही नेत्यांची संपत्ती पाच वर्षांत तब्बल ५00 टक्क्यांनी वाढल्याचा उल्लेख आहे. न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने सांगितले की, संपत्तीचे स्रोत काय आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. ही वाढ कायदेशीर व योग्य आहे का, हेही कळायला हवे.
उत्पन्न (कोटींत)
भाजपा-५७०.८३
काँग्रेस-२६१.५६
माकप- १०७.४८
बसपा- ४७.३९
तृणमूल -३४.५८
राष्ट्रवादी- ९.१४
भाकप -२.१८

 

Web Title:  Political parties 'accounting': Most donations 'anonymous', the amount of donation paid before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.