साध्वी त्रिकाल भवन्तांच्या वादात राजकीय पक्षाची उडी
By admin | Published: July 18, 2015 01:12 AM2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
आरपीआयचे निवेदन : महंत ग्यानदास यांच्यावर कारवाईची मागणी
Next
आ पीआयचे निवेदन : महंत ग्यानदास यांच्यावर कारवाईची मागणी नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी माईकची खेचाखेची करून महंत ग्यानदास यांनी असभ्य वर्तन केल्याचा साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी आरोप केला होता. आता या वादात राजकीय पक्षानी उडी घेतली असून, महंत ग्यानदास यांच्यावर कायदेशीर कारवाई व साध्वी त्रिकाल भवन्ता यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबत आठवले गटाच्या आरपीआयने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी गेल्या बुधवारी (दि.१४) पत्रकार परिषद घेऊन महंत ग्यानदास यांनी आपल्याशी असभ्य वर्तन करीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. तसेच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास स्वत: याबाबतचा तक्रार अर्ज देणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान साध्वी-महंतांच्या या वादात आता आरपीआयने उडी घेतली असून, महंत ग्यानदास यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत रिपाइंच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी साध्वी त्रिकाल भवन्ता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याप्रकरणाबाबत चर्चा केली. तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी महानगरप्रमुख पवन क्षिरसागर, दीपक डोके, राजेंद्र पाटील, अमोल नाडे, महेश जाधव, उत्तम जाधव, भावेश असमार आदि उपस्थित होते. फोटो क्र. १६पीएचजेएल९५,९६