भाजपाचा गटनेता व विरोधी पक्षनेता बदलणार नगरसेवकांनी घेतली खडसेंची भेट: सुनील माळी यांचे नाव आघाडीवर
By admin | Published: July 4, 2016 12:45 AM2016-07-04T00:45:05+5:302016-07-04T00:45:05+5:30
जळगाव: भाजपाच्या गटनेता व विरोधी पक्षनेत्यांची १ वर्षांची मुदत ठरलेली असतानाही अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही बदल करण्यात आलेला नसल्याने नगरसेवकांनी रविवारी दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सर्व नगरसेवकांनी याबाबतचे लेखी निवेदन खडसेंना सादर केेले. त्यानुसार दोन्ही पदांवर अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही गटनेतेपदासाठी सुनील माळी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
Next
ज गाव: भाजपाच्या गटनेता व विरोधी पक्षनेत्यांची १ वर्षांची मुदत ठरलेली असतानाही अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही बदल करण्यात आलेला नसल्याने नगरसेवकांनी रविवारी दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सर्व नगरसेवकांनी याबाबतचे लेखी निवेदन खडसेंना सादर केेले. त्यानुसार दोन्ही पदांवर अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही गटनेतेपदासाठी सुनील माळी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. मनपात सत्ताधारी खाविआने सर्व सदस्यांना संधी मिळावी, यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेता ही पदे सहा महिने, वर्षभरासाठी देण्याची पद्धत रूढ केली आहे. इतर राजकीय पक्षांनीही त्याचा अनुनय करीत गटनेतेपद बदलते ठेवले आहे. भाजपाचाही गटनेता पूर्वी वर्षभरासाठीच असे. मात्र या टर्मममध्ये गटनेतेपदी डॉ.अश्वीन सोनवणे, विरोधी पक्षनेतेपदी वामनराव खडके यांची निवड झाल्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही तेच या पदावर कायम आहेत. त्याबाबत कुणा सदस्याची बोलण्याची हिंमतही झाली नाही. अखेर रविवारी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यात या विषयावर चर्चा झाली. गटनेता एकनिष्ठ असावायावेळी खडसे यांनी १ वर्षात गटनेता व विरोधी पक्षनेता बदलाची रित होती, तर तसे आपल्या निदर्शनास आणून द्यायला हवे होते, असे सांगितले. तसेच पदांमध्ये बदल करण्याची तयारीही दर्शविली. मात्र या पदावर ज्येष्ठ, कनिष्ठ सभासद असा भेद न करता एकनिष्ठता व सभागृहात परखडपणे पक्षाची बाजू मांडणारा सदस्य असा निकष लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी काही सदस्यांनी गटनेतेपदासाठी सुनील माळी यांचे नाव सुचविले. मात्र अद्याप दोन्ही पदांबाबत निर्णय झालेला नसल्याचे समजते. १५ पैकी १३ सदस्यांची उपस्थितीयावेळी गटनेते डॉ.अश्विन सोनवणे व विरोधी पक्षनेते वामनराव खडके हे बाहेरगावी गेलेले असल्याने अनुपस्थित होते. मात्र उर्वरीत सर्व १३ सदस्य उपस्थित होते. तसेच आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी हे देखील उपस्थित होते.