पोलार्डची विजयी किक

By admin | Published: May 7, 2014 03:10 AM2014-05-07T03:10:03+5:302014-05-07T03:10:03+5:30

ब्राझिलमध्ये होऊ घातलेल्या फुटबॉल वर्ल्डकपचे वारे आत्तापासूनच वाहू लागले आहे. फुटबॉल सामन्यात गोलसाठी रंगणा-या किकचा थरार मुंबईच्या वानखेडे मैदानावरच मंगळवारी अुनभवायला मिळाला.

Pollard's winning kick | पोलार्डची विजयी किक

पोलार्डची विजयी किक

Next

स्वदेश घाणेकर

मुंबई -  ब्राझिलमध्ये होऊ घातलेल्या फुटबॉल वर्ल्डकपचे वारे आत्तापासूनच वाहू लागले आहे. फुटबॉल सामन्यात गोलसाठी रंगणा-या किकचा थरार मुंबईच्या वानखेडे मैदानावरच मंगळवारी अुनभवायला मिळाला. १६व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर किरॉन पोलार्डने किक मारून चेंडू त्रिफळयावर आदळला आणि युवराजला धावबाद केले. या विकेटने बँगलोरच्या विजयाच्या उरल्या सुरलेल्या आशा मावळल्या आणि मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर सलग दुस-या विजयाची नोंद केली. विजयासाठी १८८ धावांचा पाठलाग करणा-या बँगलोरला १६८ धावांवरच समाधान मानावे लागले. फुल्ल टू रो‘हिट’ बेन डंकने आज पुन्हा एकदा निराश केले. फलकावर १५ धावा असताना अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. त्यानंतर सी गौतमने मुंबईचा धावफलक हलता ठेवला. अंबाती रायडू आणि गौतम या जोडीने दुस-या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या ख-या, परंतु त्यातील १३ धावा या अवांतर होत्या. साधारण नउच्या सरासरीने मुंबईच्या धावांचा वेग होता. मात्र, चुकीच्या फटक्यांनी तो ढेपाळला. रायडूचा दांडा अशोक दिंडाने उडविला. कोरी अ‍ॅण्डरसनला धावांचा मोह भोवला. युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीवर एक षटकार खेचल्यानंतर दुसरा षटकार खेचण्याच्या नादात तोही झेलबाद होउन माघारी परतला. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनी मुंबईला दमदार मजल मारून दिली. वरूण अ‍ॅरॉन टाकलेल्या १९व्या षटकात रोहितने १९ धावा चोपल्या. रोहितने ३५ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकार ठोकून नाबाद ५९ धावा केल्या, तर पोलार्ड ३१ चेंडूंत ६ चौकार ठोकून ४३ धावांवर माघारी परतला. या दोघांच्या या फुल टू धमाल फटकेबाजीने मुंबईने १८७ धावांचे आव्हान बँगलोरसमोर उभे केले.

Web Title: Pollard's winning kick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.