विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:42 AM2018-06-23T04:42:05+5:302018-06-23T04:42:08+5:30
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०१७ रोजी संपत आहे. त्यात जयदेवराव मारुतीराव गायकवाड, विजय विठ्ठल गिरकर, माणिकराव गोविंदराव ठाकरे, संजय सतीशचंद्र दत्त, अनिल दत्तात्रय परब, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अमरसिंग शिवाजीराव पंडित, शरद नामदेव रणपिसे, सुनील दत्तात्रय तटकरे, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ जुलै असेल. मतदान व मतमोजणी एकाच दिवशी १६ जुलैला होईल.