४९ जागांवर आज बिहारमध्ये मतदान
By admin | Published: October 11, 2015 11:39 PM2015-10-11T23:39:53+5:302015-10-12T07:09:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार प्रचार मोहीम आणि मुख्यमंत्री नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाने घेतलेल्या प्रचार
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार प्रचार मोहीम आणि मुख्यमंत्री नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाने घेतलेल्या प्रचार सभांनंतर पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज सोमवारी ४९ जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत मोदी आणि नितीशकुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
या पहिल्या टप्प्यात एकूण १३५७२३३९ मतदार दहा जिल्ह्यांतील ४९ जागांसाठी नशीब अजमावत असलेल्या ५८३ उमेदवारांचे भविष्य निश्चित करतील, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी दिली. सकाळी ७ वाजता मतदानाची सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजता मतदान समाप्त होईल.
नक्षलग्रस्त भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पाहून मतदान सायंकाळी ३ आणि ४ वाजेपर्यंतच ठेवण्यात येईल.
या पहिल्या टप्प्यात ५४ महिला उमेदवार रिंगणात आहेत, असे लक्ष्मणन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)