राज्यसभा निवडणुकीसाठी २१ मार्चला होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 12:28 AM2016-02-25T00:28:52+5:302016-02-25T00:28:52+5:30
सहा राज्यांमधील एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या १३ जागांसाठी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक २१ मार्च रोजी होत आहे. अन्य १२ जागांसह नागालँडमधील एकमेव जागाही
नवी दिल्ली : सहा राज्यांमधील एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या १३ जागांसाठी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक २१ मार्च रोजी होत आहे. अन्य १२ जागांसह नागालँडमधील एकमेव जागाही एप्रिलमध्ये रिक्त होत असली तरी खा. खेखिको झिमोमी यांचे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झाल्यापासून ती रिक्त होती.
सध्या पाच जागा काँग्रेसकडे, माकपकडे तीन तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाकडे प्रत्येकी दोन जागा होत्या. ४ मार्च रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून २१ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणीही होणार असल्याची निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. पंजाबमधील पाच जागांपैकी प्रत्येकी दोन जागा काँग्रेस तर एक जागा भाजपकडे आहे. त्रिपुरातील एकमेव जागा माकपकडे आहे. केरळमधील तीनपैकी दोन जागा माकप तर एक काँग्रेसकडे होती. आसाममधील दोन्ही जागा काँग्रेसच्या तर हिमाचलमध्ये एकमेव जागा भाजपच्या ताब्यात होती.
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये माजी संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टनी, माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार आणि माजी निवडणूक आयुक्त एम.एस. गिल यांचा समावेश
आहे. (वृत्तसंस्था)