बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान
By admin | Published: October 27, 2015 11:29 PM2015-10-27T23:29:20+5:302015-10-27T23:29:20+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी ५० जागांसाठी मतदान होत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दोन पुत्रांसह एकूण ८०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद होणार
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी ५० जागांसाठी मतदान होत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दोन पुत्रांसह एकूण ८०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद होणार असून साऱ्या देशाची या मतदानावर नजर असणार आहे. यापैकी ७१ महिला उमेदवार आहेत.
या टप्प्यात महुआ आणि राघोपूर येथे मतदान होणार असून येथून यादव यांची दोन्ही मुले प्रथमच निवडणूक रिंगणात उतरली आहेत. याशिवाय त्यांचा राजकीय बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सारणमध्येसुद्धा मतदान आहे. सारणमध्ये विधानसभेच्या १० जागा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नालंदा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचाही यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)