त्रिपुरात विधानसभेसाठी आज मतदान, भाजपचे लावली ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:10 AM2018-02-18T00:10:18+5:302018-02-18T00:10:30+5:30
त्रिपुरात विधानसभेच्या ५९ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपने आव्हान आहे.
आगरतळा : त्रिपुरात विधानसभेच्या ५९ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपने आव्हान आहे.
राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. मात्र, चारीलम विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार रामेंद्र नारायण देब वर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे या ठिकाणी आता १२ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यात २० जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात चार सभा घेतल्या. या सभांना भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री माणिक सरकार हे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ठेवून लढत आहेत. प्रचार मोहिमेचे नेतृत्वही त्यांनीच केले. राज्यात ५० सभा घेऊन त्यांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. (वृत्तसंस्था)