दीपनगर प्रशासनाला प्रदूषण विभागाची नोटीस

By admin | Published: November 25, 2015 12:02 AM2015-11-25T00:02:58+5:302015-11-25T00:02:58+5:30

शेतकर्‍यांची तक्रार : नासिक प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर

Pollution department notice to Deepanagar administration | दीपनगर प्रशासनाला प्रदूषण विभागाची नोटीस

दीपनगर प्रशासनाला प्रदूषण विभागाची नोटीस

Next
तकर्‍यांची तक्रार : नासिक प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर
जळगाव : दीपनगर प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे परिसरातील पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीवरून प्रदूषण विभागातर्फे प्रकल्पाला नुकतीच नोटीस बजावण्यात आली होती याबाबतचा अहवाल उपप्रादेशिक कार्यालयाने नाशिक प्रादेशिक अधिकारी कार्यालयात २४ रोजी सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीपनगर प्रकल्पातून निघाणार्‍या राखेमुळे कठोरा बुद्रुक, कठोरा खुर्द, फुलगाव, पिंपरीसेकम व जाडगाव परिसरातील शेती परिसरातील पिकांवर विपरित परिणाम होत असल्याची तक्रार १५ आक्टोबर रोजी जिप सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी व शेतकर्‍यांनी उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाकडे केली होती. त्या अनुषंगाने प्रदूषण क्षेत्र अधिकारी नितीन सोनवणे यांनी शेतकरी, दीपनगर प्रकल्पाचे चीफ केमीस्ट सोनवणे, कनिष्ठ अभियंता मेश्राम यांच्या उपस्थितीत पहाणी केली असता जमीन व पिकांवर राख आढळून आली होती. यावेळी प्रकल्पात केलेल्या पहाणी मध्ये. प्रकल्पाच्या हवा प्रदूषण रोखणारी यंत्रणा ई.एस.पी (इलेक्ट्रो स्टॅटीक प्रेसीपीटेटर) च्या २० पैकी ३ उपकरण बंद आढळून आले होते. राज्यातील सर्वच थर्मल पावर स्टेशन मध्ये ही. ईएसपी यंत्रणा कार्यान्वित आहे.ती सद्याची हवा प्रदूषण रोखणारी प्रभावी यंत्रणा आहे. प्रकल्पात कोरडी राख बाहेर काढण्यासाठीच्या पाईपात सुद्धा लिकेज आढळून आला होता. याबबत उपप्रदेशिक प्रदूषण अधिकारी ए.एम.करे यांनी तत्काळ १६ ऑक्टोबर रोजी दीपनगर प्रशासनाला या बद्दल कारणे दाखवा नोटीस बाजावली होती.
जुन्या संचातून प्रदूषण
प्रकल्पाच्या कार्यान्वित चार संचांपैकी संच क्र २ व ३ मधून प्रदूषण अधिक होत असते. हे संच २५ वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. मंडळातर्फे १९मार्च,२८ मे,२७ जुलै, २१ ऑगस्ट या वेगवेगळ्या दिवसात संच २ व ३ परिसरात केलेल्या परीक्षणात राखेचे प्रदूषणाची नोंद करण्यात आली होती त्यात १९ मार्च व २१ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात आढळून आले होते.
प्रादेशिक कार्यालयात अहवाल
उपप्रादेशिक प्रदूषण विभागाचे क्षेत्र अधिकारी चौधरी यांनी याबाबत सखोल अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी नाशिकच्या प्रदेशिक अधिकारी कार्यालयात २४ रोजी अहवाल सादर केला.

Web Title: Pollution department notice to Deepanagar administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.