महाराष्ट्रातील ५ नद्या करणार प्रदूषणमुक्त; गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा, मुळा-मुठाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 05:39 AM2018-03-20T05:39:00+5:302018-03-20T05:39:00+5:30
प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या कामासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याला केंद्राकडून एक रुपयाही मिळालेला नाही.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या कामासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याला केंद्राकडून एक रुपयाही मिळालेला नाही.
पर्यावरण-वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशभरातील ७६ शहरांतील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी ४,५८० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यात महाराष्टÑातील योजनांसाठी ११८३ कोटी खर्च येईल, असा अंदाज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑात होणारा खर्च सर्वाधिक आहे. या प्रकल्पानुसार प्रतिदिन २६० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारले आहेत.
विविध योजनांसाठी राज्यांना २,२३७ कोटी रुपयांची केंद्रीय मदत देण्यात आली आहे. यामुळे देशभरात अशा संयंत्राची क्षमता २४४६.४३ एमएलडीपर्यंत गेली आहे.
- राज्यातील तीन शहरांत सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांची क्षमता १२७ एमएलडी करण्यात आली आहे.
कृष्णा नदीतील प्रदूषण कमी करण्यास कराड आणि सांगली येथे सांडपाणी नदीत सोडण्यापासून पायबंद घालणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी २८.७४ कोटी रुपये खर्च करून ५५ एमएलडीचे संयंत्र उभारण्यात आले आहेत.
- 87.12
कोटी रुपये महाराष्टÑातील नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सांडपाणी प्रक्रिया, गटारांचा प्रवाह रोखणे आणि दिशा बदलणे, साफसफाई, नद्यांवरील काठांचा
विकास, स्मशानगृह आदी कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत.