मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रदूषणाला लगाम - जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 04:27 AM2020-10-19T04:27:21+5:302020-10-19T04:28:52+5:30
जावडेकर म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी जे निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसत आहेत. २०१४ पर्यंत एनसीआरमध्ये २५० दिवस प्रदूषणाचा फटका बसायचा. आता ते दिवस फक्त १८० आहेत. त्यातील ४० दिवस प्रदूषण शेतांमध्ये जाळला जाणारा काडी-कचऱ्यामुळे होते.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरचे रहिवासी दरवर्षीप्रमाणेच या हिवाळ्याच्या आधीच प्रदूषणाच्या चाहुलीने त्रस्त असले तरी ार्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रदूषित दिवसांची संख्या जवळपास निम्मीच असल्याचा दावा केला आहे.
जावडेकर म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी जे निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसत आहेत. २०१४ पर्यंत एनसीआरमध्ये २५० दिवस प्रदूषणाचा फटका बसायचा. आता ते दिवस फक्त १८० आहेत. त्यातील ४० दिवस प्रदूषण शेतांमध्ये जाळला जाणारा काडी-कचऱ्यामुळे होते. फेसबुक लाईव्हमध्ये ‘लोकमत’ने विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, प्रदूषण एका दिवसात संपणारे नाही. त्याला आवरण्यासाठी सरकार सतत काम करीत आहे. मोदी सरकारने प्रदूषण निर्माण करणारे पॉवर प्लँट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दिल्लीतीलही काही पॉवर प्लँट समाविष्ट आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहे. येत्या काही वर्षांत, असे ६०-७० प्लँटस बंद केले जातील.जावडेकर म्हणाले, ‘बीएस ६ इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.