CoronaVirus News: बहुरुपी विषाणू! ११ वेळा जनुकीय परिवर्तन; ५५ देशांतील रुग्णांचा डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:30 PM2020-05-27T23:30:24+5:302020-05-27T23:30:40+5:30

एमआरच्या अभ्यासातील निष्कर्ष

Polymorphic virus! 11 genetic mutations; Patient data from 55 countries | CoronaVirus News: बहुरुपी विषाणू! ११ वेळा जनुकीय परिवर्तन; ५५ देशांतील रुग्णांचा डेटा

CoronaVirus News: बहुरुपी विषाणू! ११ वेळा जनुकीय परिवर्तन; ५५ देशांतील रुग्णांचा डेटा

Next

नवी दिल्ली : ज्या SARS-COV-2 विषाणूमुळे ‘कोविड-१९’ या रोगाची लागण होते, त्याच्यात तब्बल ११ वेळा जनुकीय परिवर्तन झाल्याचा दावा इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अभ्यासातून करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमधील आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बायोमेडिकल जेनोमिक्सच्या संशोधकांनी यासंदर्भात नुकताच अभ्यास केला. यात त्यांनी ५५ देशांतील मिळून ३ हजार ६३६ रुग्णांच्या संपूर्ण जनुकीय क्रमाचा डेटा अभ्यासला. यात भारतातील २१ नमुन्यांचाही समावेश होता. या अभ्यासातील निष्कर्षानुसार, भारतातील ४५.७ टक्के नमुन्यांमध्ये अ2ं प्रकारचा कोरोना विषाणू आढळला.

फेब्रुवारी-मार्च माहिन्यांमध्ये भारतात ‘कोविड-१९’चा संसर्ग पसरण्यास प्रारंभ झाला होता. त्यात  या प्रकाराचा संसर्ग सर्वांत जास्त प्रमाणात झाला. अभ्यासात तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी ५१ टक्के म्हणजे १ हजार ८४८ नमुन्यांमध्ये अ2ं प्रकारातील कोरोना विषाणूचे अस्तित्व दिसले. हा प्रकार म्हणजे ‘कोविड-१९’चे माहेरघर वूहानमध्ये आढळलेल्या ड प्रकाराची विकसित पिढी आहे. आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या तपासणीत ३ हजार ६३६ पैकी ५८२ नमुन्यांत ड प्रकार आढळला आहे.

वूहानमध्ये प्रामुख्याने ड प्रकारच्या कोरोना विषाणूचे अस्तित्व होते. या रोगाचा संसर्ग इतर देशात पसरायला प्रारंभ झाल्यानंतर ड प्रकारच्या विषाणूत जनुकीय परिवर्तन होऊन तो मुख्यत्वे  प्रकारात विकसित झाला. अमेरिकेतही हेच झाले. (वृत्तसंस्था)

आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, तपासणी केलेल्या २१ भारतीय नमुन्यांत वेगवेगळी जनुकीय रचना असलेले ४ प्रकारचे कोरोना विषाणू आढळले. यात सर्वाधिक प्रमाण अ2ं या प्रकाराचे आहे. २१ पैकी १६ नमुने (४५.७ टक्के) या प्रकारातील होते. १३ नमुने (३७.१ टक्के) अ3 प्रकारातील, ५ नमुने (१४.३ टक्के) ड प्रकारातील तर एक (२.९ टक्के) इ प्रकारातील होता.

Web Title: Polymorphic virus! 11 genetic mutations; Patient data from 55 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.