बहुरूपी व्हायरस : कोरोना आतापर्यंत 400 व्हेरिएंटमध्ये बदलला, ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 07:58 AM2021-12-26T07:58:08+5:302021-12-26T07:58:46+5:30
Omicron Variant : ओमायक्रॉनची चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या पहिल्या व्हेरिएंटशी देखील तुलना केली गेली. तसेच, इटलीमध्ये कहर करणाऱ्या B.1 व्हेरिएंटसोबतही तुलना करण्यात आली.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटबाबत आतापर्यंत जगभरात अनेक अभ्यास समोर आले आहेत, परंतु पहिल्यांदाच अमेरिकन तज्ज्ञांनी भारतातील वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने क्लिनिकल अभ्यास केला आहे. यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोना व्हायरस आतापर्यंत 400 वेळा व्हेरिएंटमध्ये बदलला आहे, परंतु ओमायक्रॉन कोणत्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे, याबाबत अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
मेडिकल जर्नल मेडरेक्सिवमध्ये प्रकाशित होण्यापूर्वी दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या बायोकेमिस्ट्री विभागातील तज्ज्ञांनी देखील या चालू क्लिनिकल अभ्यासात भाग घेतला आहे. 5 ते 8 डिसेंबर दरम्यान प्रथम आढळलेल्या देशातील 54,3604 रुग्णांवर 10 डिसेंबरपर्यंत केलेल्या संशोधनात दिल्लीतील तीन ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांचाही समावेश आहे. यादरम्यान, ओमायक्रॉनची चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या पहिल्या व्हेरिएंटशी देखील तुलना केली गेली. तसेच, इटलीमध्ये कहर करणाऱ्या B.1 व्हेरिएंटसोबतही तुलना करण्यात आली.
दिल्लीहून पटना एम्स येथे पोहोचलेले वरिष्ठ डॉ. आशुतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर जगभरातील शास्त्रज्ञांनी GSID नावाचा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला आहे, जिथे सर्व व्हेरिएंटचे नमुने आणि त्यांच्या सीक्वेंसिंगबाबत माहिती दिली जाते. येथून इतर देशांचे नमुने घेण्यात आले आणि भारतात कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नमुने याबाबत अभ्यास करण्यात आला. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट डेल्टा असल्याचे आतापर्यंतचे पुरावे सापडले आहेत.
दरम्यान, भारतात कोरोनाची दुसरी लाटही डेल्टा व्हेरिएंटमुळे आली. डेल्टा व्हेरिएंट शरिरातील अँटीबॉडीज कमी करतो आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण करतो. ओमायक्रॉन यासारखा नाही आहे. तो झपाट्याने पसरू शकते, परंतु तो फार घातक नाही. दक्षिण आफ्रिकेत त्याचा प्रसार आणि अँटीबॉडीज कमी होण्याची कारणे वेगळी होऊ शकतात. परंतु भारतात याचा पुरावा नाही.
संशोधनात हे आढळले...
- कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन जास्त अँटीबॉडीज कमी करू शकतो.
- ACE 2 बायडिंगसाठी कोणत्याही व्हेरिएंटच्या संबंधात वाढ होण्याची चिन्हे नाहीत.
- दक्षिण आफ्रिकेत वेगळी लाट दिसत आहे, परंतु ओमायक्रॉनमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत नाही.