८०० वर्षांपासून पूजा झाली नाही, तर यापुढेही राहू द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:08 AM2022-05-25T07:08:11+5:302022-05-25T07:08:34+5:30

कुतुबमीनारप्रकरणी कोर्टाचा निर्णय सुरक्षित

Pooja has not been performed for 800 years, so let it continue | ८०० वर्षांपासून पूजा झाली नाही, तर यापुढेही राहू द्या

८०० वर्षांपासून पूजा झाली नाही, तर यापुढेही राहू द्या

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतील कुतुबमीनारमध्ये पूजेच्या अधिकारासंदर्भात सत्र न्यायालात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवला आहे. याप्रकरणी ९ जून राेजी निर्णय देण्यात  येणार आहे. न्यायालयाने दाेन्ही पक्षकारांना एका आठवड्यात संक्षिप्त अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. 

याचिकाकर्ते काेणत्या कायदेशीर अधिकारापासून वंचित आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. तसेच गेल्या ८०० वर्षांपासून तेथे देवता पूजेपासून वंचित आहेत, तर सध्या त्यांना तसेच राहू द्यावे, असे मत न्यायालयाने नाेंदविले. कुतुबमीनार २७ मंदिरांना ताेडून बनविण्यात आले हाेते असा दावा हिंदू पक्षकारांनी केला हाेता. 

Web Title: Pooja has not been performed for 800 years, so let it continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.