येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 15:36 IST2019-06-07T15:36:22+5:302019-06-07T15:36:40+5:30
चांगला पाऊस पडावा म्हणून देशभरात विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय केले जातात. असाच एक प्रकार बंगळुरू येथून समोर आला आहे.

येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा
बंगळुरू - यंदाच्या उन्हाळ्यात पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच दिवसागणिक वाढत असलेल्या उष्म्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. चांगला पाऊस पडावा म्हणून देशभरात विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय केले जातात. असाच एक प्रकार बंगळुरू येथून समोर आला आहे. येथे चांगला पाऊस पडावा म्हणून एका मंदिरामध्ये पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून काही पूजारी पूजा करत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
हे छायाचित्र हालसुरू येथील सोमेश्वर मंदिरातील असून या व्हायरल फोटोमध्ये एक पूजारी हवन करताना दिसत आहे. तर अन्य दोन पूजारी पाण्याच्या भांड्यात बसून मंत्रोच्चार करताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे पाण्याने भरलेल्या भांड्यात बसलेल्या पुजाऱ्यांच्या हातामध्ये मोबाइलसुद्धा दिसत आहेत. हे पुजारी मोबाईलवरून हवामानाचा क्षणाक्षणाचा वृत्तांत मिळवत असावेत, असा अंदाज बांघण्यात येत आहे.
Bengaluru: Pooja performed at Someshwara temple in Halasuru yesterday for better monsoon. #Karnatakapic.twitter.com/Pe8Fo91MMU
— ANI (@ANI) June 7, 2019
दरम्यान, पुढच्या 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा दावा हवामान खात्याने केला आहे. तसेच पुढच्या पाच दिवसांमध्ये नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.