Delhi Election 2020 Results : केजरीवालांचा मोफत वीज देण्याचा निर्णय गरीबांना आवडला; भाजप खासदाराची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:37 AM2020-02-11T11:37:41+5:302020-02-11T11:37:56+5:30

Delhi Assembly Election 2020 Results News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केजरीवाल यांनी 200 पेक्षा अधिक युनिट वीजेचा वापर न केल्यास वीज पूर्णपणे मोफत अशी घोषणा केली होती.

poor voter liked Kejriwal's decision to provide free electricity; BJP MP | Delhi Election 2020 Results : केजरीवालांचा मोफत वीज देण्याचा निर्णय गरीबांना आवडला; भाजप खासदाराची कबुली

Delhi Election 2020 Results : केजरीवालांचा मोफत वीज देण्याचा निर्णय गरीबांना आवडला; भाजप खासदाराची कबुली

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. तर राजकीय नेत्यांकडून देखील या निकालावर प्रतिक्रिया देण्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या निकालात दिल्लीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेली मोफत वीज योजना गरीब मतदारांना आवडल्याचे सांगत ती आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडल्याचे भाजप खासदाराने म्हटले आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेल्या मोफत वीज योजनेमुळे गरीब मतदार प्रभावित झाल्याचे खासदार रमेश बिधुडी यांनी म्हटले आहे. तसेच भाजप कार्यकर्ते केंद्र सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले असते तर दिल्लीतील निकाल वेगळा लागला असता, असंही बिधुडी यांनी म्हटले आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केजरीवाल यांनी 200 पेक्षा अधिक युनिट वीजेचा वापर न केल्यास वीज पूर्णपणे मोफत अशी घोषणा केली होती. यामुळे सरकारवर वर्षाला 1800 ते 2000 कोटींचा बोजा पडणार, असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2015 मध्ये सत्तेत आल्यानंतर लगेच आपने वीज बिलात 50 टक्के सूट दिली होती. 

दरम्यान आक्रमक प्रचार आणि शाहीन बागेतील आंदोलन यावर खासदार बिधुडी म्हणाले की, देशद्रोह्यांना गोळ्या घाला, म्हणणे यात काहीही वाईट नाही.


 

Web Title: poor voter liked Kejriwal's decision to provide free electricity; BJP MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.