लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 07:56 PM2020-05-09T19:56:19+5:302020-05-09T20:21:51+5:30

भाजपा नेत्या आश्विनी उपाध्याय यांनी हे पोस्टकार्ड अभियान सुरु केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे उपाध्याय यांचे मत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती.

for population control law Bjp will sent 1 crore letters to PM Narendra Modi hrb | लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे यंदा देशात २ कोटी बालके जन्माला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच सव्वा कोटींहून अधिक असलेल्या लोकसंख्येमध्ये आणखी मोठी वाढ झाल्यास लोकसंख्या नियंत्रणाचे मोठे संकट देशासमोर उभे ठाकणार आहे. यामुळे देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पोस्ट कार्ड पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. 


भाजपा नेत्या आश्विनी उपाध्याय यांनी हे पोस्टकार्ड अभियान सुरु केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे उपाध्याय यांचे मत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती. यामुळे जनतेची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात येणार आहे.


यासाठी उपाध्याय यांनी लोकांना पंतप्रधान कार्यालयाला एक चिठ्ठी लिहिण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये हस्ताक्षरामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा, असे लिहिण्यास सांगितले आहे. तसेच ओळखीच्या, नातेवाईकांनाही असे करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. 

आश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, एका कुटुंबामध्ये ५ सगस्य असतील तर २० कुटुंबांचे १०० सदस्य झाले. ५० पैशांना एक पोस्टकार्ड मिळते. शंभर पत्रे पाठविण्यासाठी ५० रुपयांचा खर्च येईल. जर एका व्यक्तीने १०० लोकांकडून पोस्ट कार्ड लिहून घेतले तर एक लाख लोक १ कोटी पत्रे पीएमओला पाठविण्यासाठी यशस्वी होतील. 
जेव्हा ही पत्रे पीएमओकडे जातील तेव्हा त्याची मोजणी होईल. जेव्हा ही पत्रे रोज १०००० एवढ्या संख्येने पोहोचतील तेव्हा पंतप्रधान कार्यालयात चर्चेचा विषय बनेल. ज्यामुळे मोदींपर्यंत ही मागणी पोहोचेल आणि कायदा बनविण्यासाठी विचार होईल असे उपाध्याय म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली

महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण

नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

Web Title: for population control law Bjp will sent 1 crore letters to PM Narendra Modi hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.