दशकभरात देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांची वाढ
By admin | Published: January 22, 2015 01:57 PM2015-01-22T13:57:30+5:302015-01-22T14:34:22+5:30
देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २००१ साली मुस्लिमांची लोकसंख्या १३.४ टक्के होती ती वाढून २०११ मध्ये १४.२ टक्के इतकी झाली. राष्ट्रीय सरासरीपेक्षा मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर आजही अधिक असला तरी नव्वदच्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. १९९१ ते २००१ या काळात मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता, मात्र आता तो २४ टक्क्यांवर आला आहे.
आसाम व त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांच्या संख्येत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये ३०.९ टक्के इतके मुस्लिम होते, मात्र दशकभरानंतर २०११ साली तोच आकडा ३४. २ टक्के इतका झाला. तर बांग्लादेशमधून होणा-या घुसखोरीमुळे नागरिकांमुळे पश्चिम बंगालमधील मुस्लिमांची संख्या २५.२ टक्क्यांवरून २७ टक्के झाली आहे.
उत्तराखंडमध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत तब्बल २ टक्के वाढ दिसून आली. राज्यात २००१ साली ११.९ टक्के नागरिक होते तोच आकडा २०११ साली १३.९ टक्के इतका होता.
केरळमध्ये २००१ साली २४.७ मुस्लिम होते, २०११ साली तीच आकडेवारी २६.६ टक्के इतकी होती., तर गोव्यात २००१ साली ६.८ टक्के मुस्लिम होते, २०११ साली तो आकडा ८.४ टक्के इतका होता. जम्मू काश्मीरमधील लोकसंख्या दशकभरात ६७ टक्क्यांवरून ६८. ३ टक्क्यांवर तर हरियातील लोकसंख्या ५.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणि दिल्लीतील मुस्लिमांची लोकसंख्या ११.७ टक्क्यांवरून १२.९ टक्के इतकी झाली