केरळातील बसेसवर पॉर्न स्टार्स झळकले, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 15:40 IST2018-07-10T15:39:46+5:302018-07-10T15:40:20+5:30
केरळमधील एका टूरिस्ट बसेसची सध्या सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. या बसेसवर पॉर्न कलाकारांची छायाचित्रे रेखाटली आहेत.

केरळातील बसेसवर पॉर्न स्टार्स झळकले, फोटो व्हायरल
केरळ : केरळमधील एका टूरिस्ट बसेसची सध्या सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. या बसेसवर पॉर्न कलाकारांची छायाचित्रे रेखाटली आहेत. यावरुन सोशल मीडियात नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय सुरु झाला आहे. रेखाटलेल्या छायाचित्रांमध्ये पॉर्न स्टार मिया खलिफा, केरन ली, जॉनी सिन्स, जॉर्डी इल निनी आणि कौर्टनी केन यांचा समावेश आहेत. याशिवाय एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी हिचे सुद्धा छायाचित्र रेखाटले आहे.
Bus in Kerala😂😂😂 you cannot be serious mate 😂😂 pic.twitter.com/jS7MvL8zxF
— No (@Basi_cally) June 29, 2018
चिकोस टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसेसवर ही छायाचित्रे रेखाटली आहेत. सध्या केरळमध्ये सोशल मीडियावर याच विषयाची चर्चा सुरु आहे. नेटिझन्स याबाबतील वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत. तर काहीजण या बसेसचे फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत. 29 जूनला या बसेसचे फोटो सुरुवातील ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले.
काही नेटिझन्सनी या छायाचित्रांवर भरोसा नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत असे सांगण्यात येत आहे की, ती सर्व छायाचित्र जुनी असून ती पुन्हा ट्विट करण्यात आली आहेत. त्यामुळे याची चर्चा होत आहे. दरम्यान, फोटो व्हायरल झाल्यानंतर पॉर्न स्टार केरन ली याने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, बसेसवरील रेखाचित्र पाहून आनंद झाला.