भाजपाच्या नेत्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने घेतली अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:37 PM2019-07-25T12:37:37+5:302019-07-25T12:42:52+5:30

भाजपाच्या दोन नेतांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

The porn videos of BJP leaders went viral | भाजपाच्या नेत्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने घेतली अशी भूमिका

भाजपाच्या नेत्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने घेतली अशी भूमिका

Next

शिमला - भाजपाच्या दोन नेतांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने सध्या हिमाचल प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाची एक महिला नेता आणि एक पुरुष नेता दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर पक्षाने या दोघांवरही कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

या व्हिडीओत दिसत असलेली महिला नेता भाजपाच्या महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. तर  व्हिडीओत दिसत असलेला पुरुष हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत हिमाचल प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र शौरी यांनी हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सकडे प्रतिक्रिया देताताना सांगितले की, ''या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा लोकांना पक्षात स्थान असता कामा नये. तसेच त्यांना यापुढेही पक्षात स्थान मिळणार नाही. अशाप्रकारची अश्लीतता पक्षसंघटनेमध्ये खपवून घेतली जाणार नाही.'' 


 हा व्हिडीओ कुठल्यातरी सरकारी अतिथीगृहातील बाथरूमधील असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र हा व्हिडीओ कुठून व्हायरल झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र परिस्थितीचा अंदाज घेत भाजपाने दोन्ही नेत्यांना बाहेरची वाट दाखवली आहे.  

Web Title: The porn videos of BJP leaders went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.