पॉर्न वेबसाईट म्हणते 'आप'चा संदीप कुमार 'आमचा' कर्मचारी

By admin | Published: September 6, 2016 02:20 PM2016-09-06T14:20:50+5:302016-09-06T14:20:50+5:30

सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्यानंतर वादाच्या भोव-यात अडकलेले आम आदमी पक्षाचे निलंबित नेते संदिप कुमार हे राजकारणी नसून एका पॉर्न वेबसाईटचे कर्मचारी होते

Porn website says 'A' Sandeep Kumar's 'our' employee | पॉर्न वेबसाईट म्हणते 'आप'चा संदीप कुमार 'आमचा' कर्मचारी

पॉर्न वेबसाईट म्हणते 'आप'चा संदीप कुमार 'आमचा' कर्मचारी

Next
- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्यानंतर वादाच्या भोव-यात अडकलेले आम आदमी पक्षाचे निलंबित नेते संदिप कुमार हे राजकारणी नसून एका पॉर्न वेबसाईटचे कर्मचारी होते. ऐकून आश्चर्य वाटत असेल पण ही माहिती स्वत: पॉर्नहब या वेबसाईटने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. पॉर्नहब ही जगातील सर्वात मोठी पॉर्नोग्राफी वेबसाईट असून युझर्सने पाठवलेल्या अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या आधारे चालवली जाते. विशेष म्हणजे त्यांना कर्मचा-यांप्रमाणे वागणूक देण्यात येते आणि त्याचे पैसेही दिले जातात. 
 
पॉर्नहबने ट्विटर अकाऊंटवर 'आम्ही संदीप कुमारसह आमच्या सर्व कर्मचा-यांवर प्रेम करतो', असं ट्विट करत संदीप कुमारला टॅगही केलं होतं. या ट्विटनंतर नेटिझन्सनी संदीप कुमार यांची भरपूर खिल्ली उडवली. काही जणांनी तर संदीप कुमार खरोखर त्यांचे कर्मचारी तर नव्हते ना ? याची चौकशी करायला सांगितलं. संदीप कुमार यांची सीडी समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं. 
 
संदीप कुमार यांच्यासंबंधी एक सेक्स टेप समोर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारवाई करत संदीप कुमार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. संदीप कुमार यांच्याकडे बालकल्याण आणि सामाजिक न्याय ही खाती होती. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील तिस-या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन सर्व खुलासा करत कारवाईची माहिती दिली होती. पण पॉर्नहबने केलेल्या ट्विटमुळे सगळेच आश्चर्यचकित झाले.
 
हे ट्टिट प्रचंड व्हायरल झालं असून 3 हजार 300 लोकांनी रिट्विट केलं असून तब्बल 2 हजार 300 जणांनी लाईक केलं आहे. 
 

Web Title: Porn website says 'A' Sandeep Kumar's 'our' employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.