नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:08 PM2024-06-10T20:08:11+5:302024-06-10T20:59:42+5:30
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली - रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता सर्व मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अनेक मंत्र्यांना पुन्हा तीच खाती देण्यात आली आहेत. त्यात अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन यांच्या नावाचा समावेश आहे.
कोणाला कोणती खाती मिळाली वाचा संपूर्ण यादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी- सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि इतर सर्व पोर्टफोलिओ जे कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत.
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
अमित शाह - गृह मंत्री आणि सहकार मंत्री
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
जे.पी नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, रसायने आणि खते मंत्री
शिवराज सिंह चौहान - कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
एस. जयशंकर - परराष्ट्र व्यवहार मंत्री
मनोहरलाल खट्टर - गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
एच.डी कुमारस्वामी - अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री.
पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान - शिक्षणमंत्री
जीतनराम मांझी - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंह - पंचायत राज मंत्री, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
सर्बानंद सोनोवाल - बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री.
डॉ. वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय मंत्री.
किंजरापू राममोहन नायडू - नागरी विमान वाहतूक मंत्री
प्रल्हाद जोशी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, न्यू आणि रिन्यूएबल ऊर्जा मंत्री
जुआल ओरम - आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्री
अश्विनी वैष्णव - रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स- माहिती तंत्रज्ञान मंत्री
ज्योतिरादित्य शिंदे - दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत - सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री
अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री
किरेन रिजिजू - संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
हरदिप सिंग पुरी -पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
डॉ. मनसुख मांडविया - कामगार आणि रोजगार मंत्री, युवा कार्य आणि क्रीडा मंत्री
किसन रेड्डी - कोळसा आणि खाण मंत्री
चिराग पासवान - अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
सी. आर पाटील - जलशक्ती मंत्री
Portfolio for PM Modi-led Union Cabinet announced
— ANI (@ANI) June 10, 2024
Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, Nirmala Sitharaman, Dr S Jaishankar Piyush Goyal and Ashwini Vaishnaw retain their ministries. pic.twitter.com/LkZ0MQiTnk