पान-२ मयेप्रश्नी पोर्तुगीज सरकारचा आक्षेप निरर्थक
By admin | Published: May 8, 2014 01:22 AM2014-05-08T01:22:29+5:302014-05-08T01:31:32+5:30
(पान दोन)
(पान दोन)
मयेप्रश्नी पोर्तुगालचा आक्षेप निरर्थक : पर्रीकर
पणजी : मयेतील मालमत्तेबाबत आपल्या सरकारने जे विधेयक संमत केले आहे, त्यास पोर्तर्ुगालमधील कोणतेच कायदे किंवा पोर्तर्ुगाल-भारत यांच्यातील कोणताही करार आड येऊ शकत नाही. पोर्तुगीज सरकारने जर गोव्याच्या विधेयकास आक्षेप घेतलेला असेल तर तो निरर्थक ठरेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पोर्तुगीज सरकारने आपल्याला आक्षेपाचे पत्र पाठविलेले नाही. त्यांनी जर पत्र पाठविले तर त्यास योग्य ते उत्तर आम्ही देऊ. भारतीय घटना अगोदर पोर्तुगीज सरकारने वाचावी एवढाच सल्ला आपण पोर्तुगीज सरकारचा मान राखून देईन. संसदीय लोकशाहीत जे कायदे तयार होतात, त्या कायद्यांपेक्षा कोणताच करार हा मोठा असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तशा प्रकारचे निवाडेही दिलेले आहेत. जमिनदारी पद्धत जशी रद्द केली जाते त्याच धर्तीवर आम्ही मयेतील मालमत्तेला लाभलेले पोर्तुगिजांचे टायटल रद्द ठरविले आहे.
केंद्रात यापुढे मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार अधिकारावर येईल. प्रसंगी ते सरकार मयेचा प्रश्न हाताळील. गोवा विधानसभेत संमत झालेले विधेयक आम्ही दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या मान्यतेसाठी राजभवनवर पाठविले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
(खास प्रतिनिधी)