जिओ डेटा हॅक प्रकरणी एक संशयित ताब्यात

By admin | Published: July 12, 2017 08:39 AM2017-07-12T08:39:14+5:302017-07-12T09:04:21+5:30

रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डाटा हॅक केल्याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

In possession of a suspect in the case of Xiao Data Hack | जिओ डेटा हॅक प्रकरणी एक संशयित ताब्यात

जिओ डेटा हॅक प्रकरणी एक संशयित ताब्यात

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12- रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डाटा हॅक केल्याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. इम्रान छिम्पा असं या तरुणाचं नाव असून मुंबईतील तपास पथक लवकरच त्याची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते आहे. राजस्थानच्या सूजनगडमधून या संशयिताला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सूजनगडमधील इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी आमच्याकडून एका ग्राहकाविषयी माहिती मागवली होती, असं या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितलं आहे. 
 
magicapak.com या वेबसाईटने रिलायन्स रिलायन्स जिओचा डेटा हॅक झाल्याच्या मेसेजसोबत www.magicapk.com या वेबसाइटची लिंकही शेअर केली जात होती. या वेबसाइटवर जिओचा नंबर टाकल्यास तुमच्या सिम कार्डची सर्व माहिती उघड होत आहे, असा दावा या मेसेजमधून करण्यात येत होता. सद्यस्थितीत या वेबसाइटची सेवा खंडित करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जिओच्या सर्वच नंबरची माहिती उघड होत नव्हती. मात्र काही ठरावीक जिओ नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध होत होती. वेबसाइटवर नंबर टाकल्यास ग्राहकांचा मोबाईल नंबर, सर्कल आणि सिम सुरू झाल्याची तारीख दिसत होती, असा दावा त्या मेसेजमधून करण्यात आला होता.
 
रिलायन्स जिओचा डेटा हॅक झाल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची साक्ष सध्या नोंदवली जातं आहे. तसंच चौकशीही सुरू आहे. संशयित आरोपी इमरान छिम्पा याने त्याचं कॉम्युटर सायन्समधील शिक्षण अर्धवट सोडलं आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताचा कॉम्युटर, मोबाईल तसंच डेटा स्टोरेजची उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. 
 
सध्या महाराष्ट्र सायबर पोलिस, नवी मुंबई पोलिस आणि रिलायन्स जिओचे अधिकारी मिळून राजस्थानमध्ये तपासणी करत आहेत. एनडीटीव्हीने हि सविस्तर माहिती दिली आहे.
 

आणखी वाचा

500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता

सावधान! "जिओ"बाबतचं "ते" वृत्त म्हणजे निव्वळ अफवा

जिओचा नवा धमाका, 1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन

 
काय आहे प्रकरण ?
 
जिओनं आतापर्यंत 10 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. परंतु जिओचा डेटाबेस हॅक झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. एका वेबसाइटनं जिओचा डेटाबेस हॅक झाल्याचा दावा केला. रिलायन्सच्या जवळपास 1 कोटी 20 लाख ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रिलायन्स जिओचा डेटा हॅक झाल्याच्या मेसेजसोबत www.magicapk.com या वेबसाइटची लिंकही शेअर केली जात आहे. या वेबसाइटवर जिओचा नंबर टाकल्यास तुमच्या सिम कार्डची सर्व माहिती उघड होत आहे, असा दावा या मेसेजमधून करण्यात येत होता. सद्यस्थितीत या वेबसाइटची सेवा खंडित करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जिओच्या सर्वच नंबरची माहिती उघड होत नव्हती. मात्र काही ठरावीक जिओ नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध होत होती. वेबसाइटवर नंबर टाकल्यास ग्राहकांचा मोबाईल नंबर, सर्कल आणि सिम सुरू झाल्याची तारीख दिसत होती, असा दावा त्या मेसेजमधून करण्यात आला होता.
या सर्व प्रकाराची रिलायन्स जिओ कंपनीनं गंभीर दखल घेतली आहे. रिलायन्स कंपनीनं जिओचा डेटाबेस हॅक झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. आम्हाला समजलं आहे की, एका वेबसाइटनं निराधार आरोप करत आमचा डेटाबेस हॅक झाल्याचा खोडसाळपणा केला आहे. प्रथमदर्शनी ही माहिती अनौपचारिक असल्याचे दिसून येत आहे, असं स्पष्टीकरण जिओनं दिलं. रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे. ग्राहकांचा डेटा फक्त जिओ अधिका-यांच्या आवश्यकतेनुसार दिला जात आहे. आम्ही या सर्व प्रकाराची माहिती कायद्याची अंमलबजावणी करणा-या प्रशासनाला दिली आहे. तसेच त्या वेबसाइटवर लवकरात लवकर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. 
 
 
 

Web Title: In possession of a suspect in the case of Xiao Data Hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.